शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिनी उद्या शरद पवार यांना ऑनलाईन शुभेच्छा,पहिला मान कोल्हापूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 16:07 IST

CoronaVirusUnlock, sharadPawar, Kolhapurnews, Ncp कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी होत असलेल्या शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विशेष खबरदारी म्हणून एकच कार्यक्रम होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण राज्यभरात ११ ते २ या एकाच वेळी होणार आहे. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील कार्यकर्ते थेट पवार यांच्याशी बोलणार आहेत. सर्वांत आधी मान कोल्हापूर जिल्ह्याचा असणार आहे.

ठळक मुद्दे वाढदिनी उद्या शरद पवार यांना ऑनलाईन शुभेच्छाशाहू सांस्कृतिक सभागृहात आयोजन : ऑनलाईन संवादाचा पहिला मान कोल्हापूरला

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी होत असलेल्या शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विशेष खबरदारी म्हणून एकच कार्यक्रम होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण राज्यभरात ११ ते २ या एकाच वेळी होणार आहे.

कोल्हापुरात मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक सभागृहात हजारावर नेते, कार्यकर्ते ऑनलाईन पद्धतीने पवार यांना शुभेच्छा देऊन ५५ वर्षांच्या राजकीय, सामाजिक प्रवासाच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होणार आहेत.मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा सोहळा होणार आहे. यावेळी पवार यांच्या राजकीय, सामाजिक प्रवासाची चित्रफीत दाखवली जाणार आहे. कोल्हापुरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपण सोहळा होणार आहे. शाहू सभागृहात एक हजारजणांच्या बसण्याची सोय केली आहे, तर मोठे स्क्रीन लावले जाणार आहेत. या सोहळ्यात शरद पवार स्वत: निवडक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संवाद साधणार आहेत.कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील कार्यकर्ते थेट पवार यांच्याशी बोलणार आहेत. सर्वांत आधी मान कोल्हापूर जिल्ह्याचा असणार आहे. या सोहळ्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, शहर सरचिटणीस सुनील देसाई यांनी दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक