शरद पवार यांच्या आजोळी वाढदिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:07+5:302020-12-13T04:39:07+5:30
करंजफेण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस त्यांचे आजोळ असलेल्या गोलीवडे (ता. पन्हाळा ) ...

शरद पवार यांच्या आजोळी वाढदिवस उत्साहात
करंजफेण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस त्यांचे आजोळ असलेल्या गोलीवडे (ता. पन्हाळा ) गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. सकाळपासूनच गावकऱ्यांनी वाढदिवसाची तयारी केली होती. ग्रामस्थांनी उत्साहात केक कापत वाढदिवस साजरा केला. तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभूदे, अशा शुभेच्छासुद्धा दिल्या.
दोन वर्षांपूर्वी शरद पवार गोलीवडे गावात आले होते. ग्रामस्थांची भेट घेत गावातील विकासाबाबताची माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांनी गावात सुसज्ज शाळा आणि सांस्कृतिक हॉलसाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा फंड दिला होता. सध्या त्याचे काम सुरू असून, तेसुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या शाळेसमोर आज गावकऱ्यांनी वाढदिवस साजरा केला. देशातील राजकारणात शरद पवार यांचे मोठे नाव आहे, तरीही ते आपल्या मामाचं गाव विसरले नाहीत. आजोळी भेट देऊन मी पुन्हा येईन असे गावकऱ्यांना आश्वस्त केले होते. मामाच्या गावाला पुन्हा भेट द्या असे निमंत्रणसुद्धा दिले आहे.
फोटो : गोलीवडे (ता. पन्हाळा) येथील शरद पवार यांच्या आजोळी ग्रामस्थांनी वाढदिवस साजरा केला.