विद्यार्थी मंडळाच्या निवडीची धामधूम
By Admin | Updated: July 21, 2014 00:50 IST2014-07-21T00:48:44+5:302014-07-21T00:50:16+5:30
प्रक्रिया २५ जुलैपासून

विद्यार्थी मंडळाच्या निवडीची धामधूम
विद्यापीठ अधिविभाग स्तरीय विद्यार्थी मंडळाचे गठण शुक्रवार, २५ जुलैला ४विद्यापीठ अधिविभाग विद्यार्थी मंडळावर निवडीसाठी अधिविभाग प्रमुखांकडून नामांकन अर्ज दाखल करून घेण्याची अंतिम मुदत गुरुवार, ३१ जुलै ४नामांकन अर्जांची छाननी व महिला प्रतिनिधीसाठी नामांकन १ आॅगस्ट ४विद्यापीठ अधिविभाग स्तरीय विद्यार्थी मंडळाचे गठण व नामांकनप्राप्त विद्यार्थ्यांची नावे असणारी जाहीर सूचना कुलगुरू यांच्या स्वाक्षरीने ४ आॅगस्टला ४मंगळवार, ५ आॅगस्ट ही माघारीची मुदत आहे. विद्यापीठ अधिविभाग स्तरीय विद्यार्थी मंडळाच्या सचिव पदासाठी निवडणुकीची घोषणा बुधवार, दि. ६ आॅगस्टला ४विद्यापीठ अधिविभाग स्तरीय विद्यार्थी मंडळाच्या सचिव पदासाठी निवडणूक गुरुवार, १४ आॅगस्टला ४महाविद्यालय विद्यार्थी मंडळाचे गठण सोमवार, ४ आॅगस्टला करण्यात येणार आहे. याच दिवशी नामांकनप्राप्त विद्यार्थ्यांची नावे असणारी जाहीर सूचना प्राचार्यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात येणार आहे. ४मंगळवार, ५ आॅगस्ट हा अर्ज माघार घेण्याचा दिवस आहे. विद्यार्थी मंडळाच्या सचिव पदाच्या निवडणुकीची घोषणा बुधवार, ६ आॅगस्ट २०१४ ला होणार आहे. ४विद्यार्र्थी मंडळाच्या सचिव पदासाठी निवडणूक गुरुवार, १४ आॅगस्टला ४निवड झालेल्या सचिवांच्या नावांच्या माहितीसह संचालक, विद्यार्थी कल्याण यांच्याकडे नामांकन अर्ज प्राप्त होण्याची अंतिम मुदत सोमवार, २५ आॅगस्टला, निवड समितीची बैठक मंगळवार, २६ आॅगस्टला आहे. ४विद्यापीठ विद्यार्थी मंडळासाठी मतदार यादीची निर्मिर्ती, विद्यापीठ विद्यार्थी मंडळावर नामांकनप्राप्त गुरुवार, २८ आॅगस्टला विद्यार्थ्यांची नावे असणारी जाहीर सूचना कुलगुरू यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात येणार आहे. विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष व सचिव पदांसाठी निवडणूक शुक्रवार, १९ सप्टेंबरला.