दूध उत्पादक सभासदांच्या जीवनात आनंद फुलविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:20+5:302021-08-21T04:28:20+5:30
माद्याळ (ता.कागल) येथील हनुमान दूध संस्थेच्या वतीने १५ ऑगष्टच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक सभासदांना संसारोपयोगी साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते. ...

दूध उत्पादक सभासदांच्या जीवनात आनंद फुलविला
माद्याळ (ता.कागल) येथील हनुमान दूध संस्थेच्या वतीने १५ ऑगष्टच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक सभासदांना संसारोपयोगी साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते.
सचिव महादेव रानमाळे म्हणाले, हनुमान दूध संस्थेच्या माध्यमातून गेली २५ वर्षे १५ ऑगष्ट व २६ जानेवारीला दूध उत्पादकांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले जाते. दूध उत्पादकांना सातत्याने उच्चांकी बोनस वाटप व शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. एक कुटुंब म्हणून ही दूधसंस्था सभासदांच्या सुख-दुःखात सामील होते.
अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, महादेव रानमाळे याचबरोबर सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत दूध उत्पादकांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
फोटो:- माद्याळ (ता.कागल) येथील हनुमान दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करताना अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, सचिव महादेव रानमाळे, यावेळी सर्व संचालक मंडळ व दूध उत्पादक सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.