शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Hanuman Temple: मंत्री हसन मुश्रिफांकडून हनुमान मंदिराचे लोकापर्ण, माथा टेकून घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 12:55 IST

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ हे सध्या मतदारसंघात कार्यरत असून विविध कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण त्यांच्याहस्ते करण्यात येत आहे.

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या भाषणात शिवसेना, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला. राज यांच्या भाषणात मशिदींवर अजानच्या भोंग्याचा मुद्दाही पुढे आला. या भोंग्याशेजारील मंदिरांसमोर आम्ही हनुमान चालिसा स्पीकरद्वारे लावू, असेही राज यांनी म्हटले. राज यांच्या वक्तव्यामुळे हनुमान चालिसा आणि हनुमान मंदिर चर्चेत आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रिफ यांनी हनुमान मंदिराचे लोकापर्ण करुन त्याचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. 

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ हे सध्या मतदारसंघात कार्यरत असून विविध कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण त्यांच्याहस्ते करण्यात येत आहे. सध्या राज ठाकरेंनी हनुमान चालिसा लावू, असे म्हणत मशिदींवरील भोंगे (स्पीकर) हटविण्याची मागणी केली आहे. त्यातच, मंत्री हसन मुश्रिफ यांनी गडहिंग्लज येथे हनुमान मंदिराचे लोकार्पण केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी या मंदिराचे लोकार्पण करुन, हनुमानचरणी माथा टेकला आहे.  मुश्रिफसाहेब एका हनुमानाची शक्ती तुमच्यात आहे, पण 11 हनुमानाची शक्ती तुम्हाला मिळू दे... असा आशीर्वाद प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी मुश्रिफ यांना दिला आहे. या व्हिडिओत मंदिर दर्शनाचा तो क्षण दिसून येत आहे. 

दरम्यान, आपल्या जवळपास एक तासाच्या भाषणात राज यांनी अनेक मुद्द्यांवरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं. त्यामध्ये, मशिदींवर लागणाऱ्या अजानच्या भोंग्यालाही त्यांनी विरोध दर्शवला. तसेच, हे भोंगे बंद न केल्यास शेजारील मंदिरांवर स्पीकर लावून हनुमान चालिसा वाजविण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले.  

टॅग्स :MumbaiमुंबईHasan Mushrifहसन मुश्रीफMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे