‘अपंग कल्याण’चा कारभार चालतो 'उसन्यां'वर

By Admin | Updated: January 21, 2015 23:59 IST2015-01-21T23:33:06+5:302015-01-21T23:59:26+5:30

हव्या त्यावेळी उसने कर्मचारी घेऊन आपलीच एक नियमावली तयार करून येणाऱ्या अपंगांवर लादली जात आहे. येथील गलथान, भोंगळ, मनमानी कारभाराचा त्रास अपंगांना होत आहे.

The handicapped welfare is run by the people | ‘अपंग कल्याण’चा कारभार चालतो 'उसन्यां'वर

‘अपंग कल्याण’चा कारभार चालतो 'उसन्यां'वर

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -अपंगांना मार्गदर्शन करून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून ‘कल्याण’ करण्याची जबाबदारी असणाऱ्या येथील जिल्हा परिषद अपंग कल्याण विभागाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. एकटे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते कारभार हाकत आहेत. हव्या त्यावेळी उसने कर्मचारी घेऊन आपलीच एक नियमावली तयार करून येणाऱ्या अपंगांवर लादली जात आहे. येथील गलथान, भोंगळ, मनमानी कारभाराचा त्रास अपंगांना होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यालयात येण्यासाठी तयार केलेल्या रँपसमोर दुचाकी पार्किंग केली जाते. परिणामी, हा विभाग नेमके कुणाचे कल्याण करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अपंग कल्याण विभाग हा समाजकल्याण अधिकारी सुंदरसिंह वसावे यांच्याच अखत्यारित येतो. या विभागात अध्ययन सल्लागार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते अशी महत्त्वाची पदे मंजूर आहेत. त्यातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते शंकर फडतरे कार्यरत आहेत. उर्वरित पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.
जिल्ह्यातील अपंग शाळांची नोंदणी व नूतनीकरण करणे, अपंग शाळांचे अनुदान निर्धारण करणे, आदी कामांची जबाबदारी या विभागावर आहे. परंतु, यातील बहुतांश जबाबदारी विभागाकडून पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी आहेत येथील ‘उसने’ कर्मचारी आपण अपंगांचे काम करतो, म्हणजे त्यांच्यावर मेहरबानीच करत असल्याच्या अविर्भावात असतात. ‘उसन्या’ कर्मचाऱ्यांकडून अपंगांना ‘उपऱ्याची’च वागणूक मिळत आहे. व्हीलचेअरवरून येणाऱ्या अपंगांसाठी रँप आहे. मात्र, रँपसमोरच अनेक दुचाकी लावलेल्या असतात. रँपसमोरची वाहने काढण्यास लावावे, असे अधिकाऱ्यांनाही वाटत नाही.

Web Title: The handicapped welfare is run by the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.