शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेतील हाणामारी व्हॉट्स अ‍ॅप मेसेजवरून - :शिक्षक-लिपिक राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 01:09 IST

: हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिक्षक आणि लिपिक यांच्यात झालेल्या हाणामारीमागे त्याआधी व्हॉट्स अ‍ॅपवर टाकलेले मेसेज कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॉट्स अ‍ॅप मेसेजवरून सुरू

ठळक मुद्दे मेसेजमध्ये असभ्य भाषा वापरल्याचे स्पष्ट

कोल्हापूर : हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिक्षक आणि लिपिक यांच्यात झालेल्या हाणामारीमागे त्याआधी व्हॉट्स अ‍ॅपवर टाकलेले मेसेज कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॉट्स अ‍ॅप मेसेजवरून सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान नंतर हाणामारीत झाल्याची माहिती हाती आली आहे.

शिक्षक बॅँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक राजमोहन पाटील आणि हातकणंगले पंचायत समितीतील पगारपत्रक विभागाचे लिपिक एस. के. येळे यांच्यामध्ये गुरुवारी (दि. १६) दुपारी हाणामारी झाली होती.हाणामारीच्या आधी पाटील हे काही दिवस शिक्षकांच्या पगाराबाबत येळे यांच्याकडे चौकशी करत होते. याबाबत त्यांनी शिक्षकांच्या ग्रुपवर मेसेज टाकला होता. यामध्ये येळे यांच्याबाबत त्यांनी असंसदीय शब्द वापरल्याचे समजते. शिक्षकांच्या गु्रपवर पाटील यांनी असा मेसेज टाकल्याने येळे संतापले. त्यांनीही त्यापेक्षा घाणेरड्या भाषेत त्यांना या ग्रुपवरूनच उत्तर दिले.

त्यामुळे हे दोघे जेव्हा पंचायत समितीच्या आवारात समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात हाणामारी झाली. यानंतर पंचायत समितीच्या मासिक सभेत पदाधिकाऱ्यांनी पाटील यांची बाजू ऐकून घेतली. मात्र, येळे यांना बोलावले असता ते परस्पर रजा टाकून निघून गेल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी कोल्हापूर जिल्हा प्र्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमन मित्तल यांची भेट घेऊन येळे यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्याची सखोल चौकशी करून कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.घटनेचा अहवाल जिल्हा परिषदेतदरम्यान, या घटनेचा अहवाल तातडीने जिल्हा परिषदेत मागवून घेण्यात आला आहे. गटविकास अधिकाºयांना या घटनेचा अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा अहवाल हातकणंगले पंचायत समितीतून पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आता याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल काय भूमिका घेणार आहेत, याकडे साºयांचे लक्ष लागून राहिले आहे. 

कोणत्याही परिस्थितीमध्ये मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. या घटनेचा अहवाल मी मागविला असून, संबंधित कर्मचाºयाची चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.- अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदTeacherशिक्षक