गडहिंग्लजमध्ये लमाण झोपड्यांवर हातोडा !

By Admin | Updated: June 8, 2014 01:15 IST2014-06-08T01:10:24+5:302014-06-08T01:15:22+5:30

सहा तासांंची मोहीम : सात झोपड्या हटविल्या

Hammer on the slums in Gadhinglaj! | गडहिंग्लजमध्ये लमाण झोपड्यांवर हातोडा !

गडहिंग्लजमध्ये लमाण झोपड्यांवर हातोडा !

औरंगाबाद : जेईई मेन्स परीक्षेच्या निकालापाठोपाठ बारावीचा निकाल घोषित झाला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडावी, विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी तंत्रशिक्षण विभागाने मराठवाड्यात २८ अ‍ॅडमिशन नोंदणी तथा सेवा-सुविधा केंद्रे (ए.आर.सी. सेंटर) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात औरंगाबाद शहरातील १३ केंद्रांचा समावेश आहे.
अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची लगभग सुरू झाली आहे. यंदा विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १० जून रोजी मिळणार आहे. त्यानंतरच अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी या वर्षी प्रथमच तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी मराठवाड्यात सेवा-सुविधा आणि नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रात जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसह हजर राहून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन किट देण्यात येईल. या अ‍ॅडमिशन किटसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ७०० रुपये, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय तेथे अतिरिक्त ५० रुपये भरून विद्यार्थ्यांना संगणक, प्रिंटर आणि झेरॉक्सची सुविधाही मिळणार आहे.
राज्यभरात २५३ प्रवेश नोंदणी केंदे्र निश्चित केली आहेत. या केंद्रप्रमुखांना तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने १३ जून रोजी मुंबईत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अशा प्रकारची प्रवेश नोंदणी केंद्रे सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुखांना याविषयीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण कार्यालयातील विशेष कार्याधिकारी डॉ. एस.एस. रगटे यांनी सांगितले.
सेवा-सुविधा केंद्रांची संख्या
औरंगाबाद १३, जालना १, बीड ३, उस्मानाबादेत ३, लातूरला ३, नांदेड २, हिंगोली १, परभणी १.
औरंगाबादेतील केंद्रे
श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी कॉलेज, जेएनईसी, पीईएस अभियांत्रिकी कॉलेज, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, हायटेक अभियांत्रिकी कॉलेज, वाळूज, सावित्रीबाई महिला अभियांत्रिकी कॉलेज, इंटरनॅशनल सेंटर कॉलेज आॅफ एक्सलन्स, छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी कॉलेज आणि औरंगाबाद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचा समावेश आहे.

Web Title: Hammer on the slums in Gadhinglaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.