गोव्यातील समुद्रात बुडून हलकर्णीच्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:42+5:302021-07-07T04:30:42+5:30
मंगळवारी (६) सकाळी ११ वाजता कोलवा बीचवर मृतदेह आढळून आला. यावेळी त्याचा ओरिसा येथील गोवास्थित मित्र ...

गोव्यातील समुद्रात बुडून हलकर्णीच्या युवकाचा मृत्यू
मंगळवारी (६) सकाळी ११ वाजता कोलवा बीचवर मृतदेह आढळून आला.
यावेळी त्याचा ओरिसा येथील गोवास्थित मित्र मुस्तफिन शेख हादेखील बुडाला असून त्याचा मृतदेह रविवारी कोलवा बीच परिसरात सापडला होता. दोघेही बीचवर फिरायला गेले असता लाटांचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान त्याच्यावर मंगळवारी हलकर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हलकर्णीकर सुन्न झाले आहेत.
अनवश याचे शिक्षण बी.एससी झाले असून हा गेल्या तीन वर्षांपासून वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीत काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहेत.
चौकट :
हे होते घटनास्थळी थांबून
रविवारी (४) दुपारच्या सुमारास घटना घडल्याचे समजल्यावर हलकर्णीतील मृताचे काका नजीर ताशिलदार, हसन ताशिलदार, चुलते फयाज ताशिलदार, शोएब पानारी, समीर बाडकर हे पाच जण तातडीने घटनास्थळी पोहोचले. रविवारी तासभर शोधमोहीम राबवून थांबवली. पुन्हा सोमवारी मृतदेहाची शोधाशोध करण्यात आली. मात्र, त्याला यश आले नाही. मात्र, त्याच रात्री अनवशचा मित्र मुस्तफिनचा मृतदेह सापडला तर मंगळवारी (६) दुपारी अनवशचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेह सापडेपर्यंत हे पाचही जण घटनास्थळी बीचवर दोन रात्री थांबून होते.
----------------------
अनवश ताशिलदार : ०६०७२०२१-गड-०१