शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची चंगळ; कोल्हापुरात परीक्षेच्या तीन तासांआधीच सहामाहीचे पेपर युट्यूबवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 12:33 IST

मुख्याध्यापक संघाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर : एकीकडे स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे म्हणून शिक्षण विभाग प्रयत्न करत असला तरी दुसरीकडे मात्र आठवी ते दहावीच्या सहामाही परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तीन तास आधीच थेट प्रश्नपत्रिकाच एका यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळत असल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात उघड झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करण्याऐवजी हे यूट्यूब चॅनेल पाहूनच परीक्षेला जात आहेत. यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील आंधळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. सध्या पाचवी ते दहावीपर्यंतची सहामाही परीक्षा सुरू आहे.जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने सहामाही परीक्षेला २७ ऑक्टोबरला सुरुवात झाली असून, ६ नोव्हेंबरला संपणार आहेत. यातील आठवी ते दहावीतील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तब्बल तीन तास आधीच विद्यार्थ्यांना एका यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळत आहेत. या चॅनेलबाबत काही शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांना माहीत आहे. मात्र, ते याकडे कानाडोळा करत असल्याने विद्यार्थ्यांची 'परीक्षा' बिनबोभाट होत आहे. मात्र, यामुळे परीक्षा घेण्याचा मूळ उद्देशच बाजूला पडत असल्याचे चित्र आहे.मुख्याध्यापक संघाला हे माहीत नाही?पाचवी ते दहावीच्या सहामाही परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मुख्याध्यापक संघ काढते. त्याची गोपनीयता ठेवली जात असल्याचा दावा संघाकडून केला जातो. मात्र, असे असूनही या प्रश्नपत्रिका फुटतात कशा, असा प्रश्न आहे. केवळ विद्यार्थ्यांना पास करण्यासाठीच मुख्याध्यापक संघाकडून या परीक्षा घेतल्या जात आहेत का? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तीन वर्षांपासून मिळतात प्रश्नपत्रिकाआठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून यूट्यूब चॅनेलवर प्रश्नपत्रिका मिळत असल्याचे एका पालकाने सांगितले. या तीन वर्षांत मुख्याध्यापक संघाला प्रश्नपत्रिका फुटत असल्याचे कळाले कसे नाही? हा प्रश्न आहे. एका गुणवंत विद्यार्थ्याने याबाबत एका शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांकडे याबाबत तक्रार केली. मात्र, त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रश्नपत्रिका काढण्यापासून ते शाळास्तरापर्यंत ही साखळी असल्याचा संशय आहे.

सकाळी आठलाच प्रश्नपत्रिका कळतेसंबंधित यूट्यूब चॅनेलवर सकाळी आठ वाजताच प्रश्नपत्रिका दाखविली जाते. ज्या विद्यार्थ्यांना या यूट्यूबबद्दल माहिती आहे ते विद्यार्थी सकाळी आठपासूनच यूट्यूबर प्रश्नपत्रिका पाहत बसतात. जे प्रश्न आहेत त्यानुसार उत्तरांचे पाठांतर करतात. आठवी व नववीमध्ये सहामाही परीक्षेचे गुण अंतिम गुणांकनात ग्राह्य धरले जातात. सहामाही परीक्षेचा कारभार अशा प्रकारे चालत असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

मुख्याध्यापक संघामध्ये पाचवी ते दहावीच्या सत्र परीक्षा, पूर्व परीक्षा निर्मिती करून छपाईचे काम केले जाते. परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच घ्याव्यात अशा सक्त सूचना शाळांना दिलेल्या आहेत. वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यापूर्वी नॅचरल होमवर्क २०२३ या यूट्यूब चॅनेलवर मुख्याध्यापक संघाच्या प्रश्नपत्रिका व्हायरल केल्या आहेत. व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख, सायबर व शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रश्नपत्रिकाचेे वितरण संघाने शाळांना केल्यानंतर या प्रश्नपत्रिकेची जबाबदारी मुख्याध्यापक व परीक्षा प्रमुखांची आहे. - अजित रणदिवे सहसचिव मुख्याध्यापक संघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाYouTubeयु ट्यूब