शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

नारळ दुकातून दीड लाखाची रोकड लंपास; लक्ष्मीपुरीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:21 IST

दुकानासमोर पाच रुपयांचे क्वाइॅन पडले आहे असे सांगून दोघा अल्पवयीन मुलांनी लक्ष्मीपुरी येथील नारळ व्यापाऱ्याच्या दुकानातील दीड लाखाची रोकड भर दिवसा लांबवली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. सदाशिव शेट्टे (वय ७५ रा. कराड) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत.

ठळक मुद्देनारळ दुकातून दीड लाखाची रोकड लंपासभरदिवसा दोघा अल्पवयीन मुलांचे कृत्य

कोल्हापूर : दुकानासमोर पाच रुपयांचे क्वाइॅन पडले आहे असे सांगून दोघा अल्पवयीन मुलांनी लक्ष्मीपुरी येथील नारळ व्यापाऱ्याच्या दुकानातील दीड लाखाची रोकड भर दिवसा लांबवली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. सदाशिव शेट्टे (वय ७५ रा. कराड) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत.अधिक माहिती अशी, कराड (जि. सातारा) येथील नारळ व मसाल्यांचे व्यापारी सदाशिव शेट्टे (वय ७५) यांचे लक्ष्मीपुरी परिसरात सचिन ट्रेडर्स नावाचे होलसेल नारळ विक्रीचे दुकान आहे. त्यांचा मुलगा सचिन हा दूकान चालवतो. तो बाहेरगावी गेल्याने सोमवारी दुकानात ते थांबले होते. रविवारी कोकणातील व्यापाऱ्यांकडून वसुल करून आणलेली दीड लाखांची रोखड त्यांनी दुकानातील गल्यामध्ये ठेवली होती. कुलप लावून चावी समोरच ठेवून ते दरात बसले होते. त्यांचा कामगार उत्तम तोडकर हा काही कामानिमित्त बाहेर गेला होता.दुपारी साडेबाराच्या सुमारास १४ व १६ वर्षाचे दोघे मुले त्यांच्या दुकानात आली. नारळाचे दर विचारत शेट्टे यांना बोलण्यात व्यस्त ठेवले. यावेळी दूसऱ्या मुलाने पाठीमागून दुकानात प्रवेश केला. समोर बोलत थांबलेल्या मुलाने माझे पाच रुपये पडले आहेत शोधून द्या, असे म्हणुन त्यांना यडबडून ठेवले. पाठिमागून दूकानात घुसलेल्या मुलाने गल्ल्यातील दीड लाखाची रोकड लंपास केली. त्यानंतर शेट्टे यांच्या समोर उभा असलेला मुलगाही निघून गेला.

काही वेळाने कामगार दूकानात आला. त्याने गल्ला उघडला असता पैसे नसल्याचे दिसून आले. हा प्रकार ऐकून शेट्टे यांनाही धक्का बसला. त्यांनी हाकेच्या अंतरावरील लक्ष्मीपूरी पोलीसांना फोनवरुन माहिती दिली. पोलीस निरीक्षक वसंत बाबर पथकासह दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. स्थानिक सराईत अल्पवयीन चोरटे असण्याची शक्यता असलेचे पोलीसांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर