शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड तिलारीनगरमध्ये साडेदहा लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 10:26 IST

चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तिची तपासणी केली असता सहा लाख सात हजार रुपये किमतीचे गोवा बनावट मद्याचे ११० बॉक्स तसेच चार लाख ५७ हजार किमतीचे वाहन व मोबाईल असा एकूण १० लाख ६४ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देचंदगड तिलारीनगरमध्ये साडेदहा लाखांचा मद्यसाठा जप्तराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तिची तपासणी केली असता सहा लाख सात हजार रुपये किमतीचे गोवा बनावट मद्याचे ११० बॉक्स तसेच चार लाख ५७ हजार किमतीचे वाहन व मोबाईल असा एकूण १० लाख ६४ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चालक प्रीतेश उल्हास पांगम (वय २९, रा. कोनाळकट्टा, कट्टावाडी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेतले.तिलारी घाटमार्गावरून काही व्यक्ती बेकायदा गोवा बनावट मद्याची अवैधरीत्या चोरटी वाहतूक करून मद्याची देवाणघेवाण करणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. या मार्गावर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला.

मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास तिलारीनगर येथील वीजनिर्मिती कार्यालयासमोरील शेतवडीत काहीजणांची संशयास्पद हालचाल दिसून आली. पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा घातला असता तेथे महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप थांबलेली दिसून आली. या वाहनाची तपासणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी गेले असता संशयितांना छाप्याची चाहुल लागली. संशयितांनी वाहन चालू करून भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येण्याचा प्रयत्न केला.यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळील वाहन बोलेरोसमोर उभे करून तपासणी केली असता त्यामध्ये प्रवासी बसण्याच्या रचनेत बदल करून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा बॉक्स मिळून आला. अंधाराचा फायदा घेऊन सुनील राजाराम घोरपडे याच्यासह अन्य पसार झाले.

घोरपडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या आदेशाने जिल्हा अधीक्षक गणेश पाटील व उपअधीक्षक बापूसो चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, चंदगड पोलीस निरीक्षक सातपुते, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळे, जय शिनगारे, रंजना पिसे व चंदगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली. 

 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरgoaगोवा