सरवडे परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:22 IST2021-04-26T04:22:28+5:302021-04-26T04:22:28+5:30

सरवडे : राधानगरी तालुक्यातील सरवडे, कासारपुतळे परिसरात सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे सरवडे- कासारपुतळे मार्गावर विद्युत डांबावर ...

Hail with strong winds in Sarvade area | सरवडे परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

सरवडे परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

सरवडे : राधानगरी तालुक्यातील सरवडे, कासारपुतळे परिसरात सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे सरवडे- कासारपुतळे मार्गावर विद्युत डांबावर झाड कोसळले, तर काही विद्युत पोलही उन्मळून पडले.

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या परिसरात वादळी वारा आला आणि गारांसह जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे शेतकरीवर्गाची धांदल उडाली. दरम्यान, कासारपुतळे येथे पोल कोसळल्याने या विभागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही तासांनी नदीकडील विद्युत पुरवठा बंद ठेवून वरील सर्व गावांना वीज सुरू करण्यात आली. मात्र, गावांना पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पोल उभारल्यावर पाणीपुरवठा सुरू होणार आहे.

.........

फोटो

१) कासारपुतळे येथे वादळी पावसाने विद्युत पोलवर पडलेले झाड.

२) पावसाच्या पाण्याने उन्मळून पडलेले विद्युत पोल.

Web Title: Hail with strong winds in Sarvade area