शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

हॅकर्सनी कोल्हापूरातून लांबविले ६७ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 4:45 AM

पैसे ३४ बँक खात्यांमध्ये केले वर्ग

कोल्हापूर : एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपये हॅकर्सनी आॅनलाईनद्वारे परराज्यांतील ३४ लोकांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही खाती गोठविण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांत संबंधित खातेदारांची चौकशी करण्यासाठी पथके रवाना केली जाणार आहेत.शाहूपुरी पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल अशा तिन्ही पातळीवर हा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारीदिली. बँकेचे सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी अतिजलद संगणक कार्यप्रणालीचा आॅनलाईन वापर करून दि. १९ एप्रिलला सकाळी ११ ते २ या तीन तासांत एचडीएफसी बँकेच्या खात्यातून इतर खात्यावर रक्कम वर्ग केली आहे. संबंधित ३४ खातेदारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. ही सर्व खाती पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा या राज्यातील आहेत.गरीबांना दाखविले आमिष?पैसे ट्रान्सफर करणाऱ्या हॅकर्सनी गरीब लोकांना काही रकमेचे आमिष दाखवून त्यांच्या खात्यावर पैसे घेतले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. रक्कम वर्ग झालेली सर्व खाती गोठविण्यासाठी पोलिसांनी संबंधित बँकांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. खातेदारांची नावे, ही खाती कधी सुरू झाली, त्यावरील व्यवहारांची माहिती पोलीस घेत आहेत.बँकांची कार्यप्रणाली लक्षात घेऊन आॅनलाइन सुरक्षा यंत्रणेतील उणिवा शोधून असे गुन्हे केले जातात. अशा पद्धतीने यापूर्वी घडलेल्या गुन्ह्याची माहिती घेतली जात आहे. पैसे वर्ग झालेल्या सर्व खात्यांची कसून चौकशी सुरू आहे. एचडीएफसी बँकेतील अधिकारी व कॅशिअरचेही जबाब नोंदविले जातील.