बहिरेवाडी येथे एच. आर. जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:27 IST2021-03-01T04:27:56+5:302021-03-01T04:27:56+5:30

वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध संघाच्या नूतन उपाध्यक्षपदी बहिरेवाडी येथील जनसुराज्यशक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते हिंदुराव रंगराव तथा एच. ...

H. at Bahirewadi. R. Jadhav felicitated | बहिरेवाडी येथे एच. आर. जाधव यांचा सत्कार

बहिरेवाडी येथे एच. आर. जाधव यांचा सत्कार

वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध संघाच्या नूतन उपाध्यक्षपदी बहिरेवाडी येथील जनसुराज्यशक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते हिंदुराव रंगराव तथा एच. आर. जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करून मिरवणूक काढली. परिसरातील सहकार, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन निवडीबद्दल सत्कार केला.

एच. आर. जाधव यांच्यारूपाने बहिरेवाडी गावाला वारणा दूध संघाच्या उपाध्यक्षपदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. यापूर्वी बहिरेवाडी येथील आनंदराव जाधव (पैलवान अण्णा) यांनी संघाचे उपाध्यक्षपद भूषविले होते.

यावेळी एच. आर. जाधव सहकार समूहाच्यावतीने वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांचा सत्कार नूतन उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी केला.

वारणा दूध संघाच्या प्रधान कार्यालयात उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उपाध्यक्ष जाधव यांचे स्वागत वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. आमदार मानसिंगराव नाईक, विराज नाईक यांच्यासह वारणा व परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपाध्यक्ष जाधव यांचा सत्कार केला.

यावेळी बहिरेवाडीचे लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव, अमरसिंह जाधव, प्रदीप चव्हाण, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

..........

फोटो ओळी...

बहिरेवाडी येथील एच. आर. जाधव सहकार समूहाच्यावतीने आमदार डॉ. विनय कोरे यांचा सत्कार वारणा दूध संघाचे नूतन उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी केला. यावेळी लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: H. at Bahirewadi. R. Jadhav felicitated