कसबा बावड्यात ४९ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:25+5:302021-09-26T04:27:25+5:30
कोल्हापूर : राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना त्याचा बेकायदेशीर साठा केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी एकावर गुन्हा नोंदवला. मुकेश उत्तम मछले ...

कसबा बावड्यात ४९ हजारांचा गुटखा जप्त
कोल्हापूर : राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना त्याचा बेकायदेशीर साठा केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी एकावर गुन्हा नोंदवला. मुकेश उत्तम मछले (वय ३९, रा. शिये, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांच्या कारवाईत सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी आदी गुटखाजन्य पदार्थ व एक दुचाकी असा सुमारे ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कसबा बावड्यात झुम कचरा प्रकल्प परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना त्या आदेशाचे उल्लंघन होईल, असी गुुटख्यांची पाकिटे, गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखूजन्य मान मसाला आदी पदार्थांचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शाहुपुरी पोलिसांनी झुम कचरा प्रकल्प परिसरात छापा टाकला असता त्यावेळी स्वत:च्या फायद्याकरिता विक्री करण्याच्या उद्देशाने मुकेश मछले याने गुटखा, गुटखाजन्य पदार्थांचा साठा केल्याचे निदर्शनास आले. हा साठा जप्त केला. त्याच्यावर अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलमान्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई शाहुपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील, पोलीस तानाजी चौगले, धर्मा बागडे, अभय कटकर, दिनेश गावित, अनिल गावडे यांनी केली.