शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात नागाळा पार्क परिसरात लाखाचा गुटखा जप्त; संशयितास अटक

By उद्धव गोडसे | Updated: October 21, 2023 12:09 IST

कोल्हापूर : सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या संशयितास शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. १९) रात्री खानविलकर पेट्रोल पंप ...

कोल्हापूर : सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या संशयितास शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. १९) रात्री खानविलकर पेट्रोल पंप चौकात अटक केली. प्रमोद दिनकर माळी (वय ४५, रा. सोनतळी, ता. करवीर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लाखाचा गुटखा आणि दोन लाखाची कार असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणारी एक कार कसबा बावड्याकडून शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बावडा रोडवर सापळा रचला होता. गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास खानविलकर पेट्रोल पंप चौकात पोलिसांना संशयित कार आढळली.कारची झडती घेतली असता त्यामध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी असा सुमारे लाखाचा मुद्देमाल मिळाला. कारचालक माळी याला अटक करून पोलिसांनी कारसह मुद्देमाल जप्त केला. त्याने कोणाकडून गुटखा आणला आणि पुढे कोणाला विक्री करणार होता, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस