गुटखा पुडी दिली नाही म्हणून खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:18 IST2021-07-16T04:18:37+5:302021-07-16T04:18:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे गुटखा पुडी दिली नाही, अशा क्षुल्लक कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्यात ...

Gutkha pudi not given so murderous attack | गुटखा पुडी दिली नाही म्हणून खुनी हल्ला

गुटखा पुडी दिली नाही म्हणून खुनी हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे गुटखा पुडी दिली नाही, अशा क्षुल्लक कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला. कुणाल सुनील सावंत (वय २०, रा. दत्तनगर, गल्ली नं. ३) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक फरार आहे. शुभम पट्टणकुडे, सोन्या ऊर्फ संदीप पाटील व सिद्धू (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत; तर शिवा शिंगे हा फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वरील जखमी व संशयित आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. दत्तनगर गल्ली नं. ६ मध्ये कुणाल हा गुरुवारी दुपारी मोबाईलवर खेळत बसला होता. त्यावेळी शुभम याने कुणाल याच्याकडे गुटख्याची पुडी मागितली. मात्र, त्याने नकार देताच याचा राग मनात धरून शुभम याने वरील तिघांना बोलावले. ते मोटारसायकलवरून आले असता शुभम याने कुणाल याच्यावर तलवार हल्ला केला. त्यामध्ये त्याच्या दोन्ही हातांवर वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कबनूर येथून शुभम, सोन्या व सिद्धू यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Gutkha pudi not given so murderous attack