इचलकरंजी येथे २.३० लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:43+5:302021-01-08T05:21:43+5:30
इचलकरंजी : गणेशनगरमधील एका दुकानात बेकायदेशीर गुटखा साठा ठेवल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी एकास अटक केली. सचिन विलास गरड (वय ३२, ...

इचलकरंजी येथे २.३० लाखांचा गुटखा जप्त
इचलकरंजी : गणेशनगरमधील एका दुकानात बेकायदेशीर गुटखा साठा ठेवल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी एकास अटक केली. सचिन विलास गरड (वय ३२, रा. गणेशनगर गल्ली नं. ५) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून विविध कंपनींचा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी असा दोन लाख ३० हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी, गणेशनगर येथे रुक्मिणी ट्रेडर्स या दुकानामध्ये सचिन हा गुटखा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे विजय उनवणे यांनी पंचनामा करून दुकान सील केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र यादव, सुरेश कोरवी, रवी महाजन, अर्जुन फातले, महेश कोरे, शशिकांत ढोणे यांनी केली.
(फोटो ओळी)
०४०१२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत गणेशनगर येथील एका दुकानात बेकायदेशीररित्या गुटखा साठा केल्याप्रकरणी संशयितास अटक करून गुटखा साठा जप्त केला.