केर्ली येथे छाप्यात पावणेचार लाखांचा गुटखा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:30+5:302021-09-09T04:30:30+5:30
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ले येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे ३ लाख ८५ हजाराचा गुटखाचा साठा व मोटारकार असा ...

केर्ली येथे छाप्यात पावणेचार लाखांचा गुटखा साठा जप्त
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ले येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे ३ लाख ८५ हजाराचा गुटखाचा साठा व मोटारकार असा सुमारे ६ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना विक्रीसाठी आणलेल्या गुटख्यावर कारवाई केली. या कारवाईत अनिल भीमराव शेलार (वय ४२, रा. केर्ले) याला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वषेण पथकाने अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राज्यात गुटखा विक्री करण्यास बंदी असताना केर्ली येथे अनिल शेलार याने आपल्या घरी वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी सुपारी तंबाखू, सुपारी, पान मसाला व सुगंधी जर्दा तत्सम गुटखाजन्य पदार्थाचा साठा करून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेथे विक्री करण्याच्या उद्देशाने आणून ठेवलेला सुमारे ३ लाख ८६ हजार ८५४ रुपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळला. तसेच त्या गुटख्याची वाहतुक करणारी सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीची मोटारकार आढळली. पोलिसांनी असा गुटख्याच्या साठा व मोटारकार जप्त केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहा. पोे. नि. शिवानंद कुंभार, सहा. फौजदार चंदू नन्नवरे, शिवाजी जामदार आदींनी केली.
फोटो नं. ०७०९२०२१-कोल-गुटखा०१
ओळ : केर्ली (ता. करवीर) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने छापा टाकून बेकायदेशीर गुटखा विक्रीप्रकरणी अनिल शेलार याला अटक करुन त्याच्या ताब्यातून गुटख्याचा साठा व मोटार कार जप्त केली.
080921\08kol_8_08092021_5.jpg
ओळ : केर्ली (ता. करवीर) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने छापा टाकून बेकायदेशीर गुटखा विक्री प्रकरणी अनिल शेलार याला अटक करुन त्याच्या ताब्यातून गुटख्याचा साठा व मोटार कार जप्त केली.