शासनाच्या आदेशानुसार शाळेत गुरुजींची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST2021-06-17T04:18:08+5:302021-06-17T04:18:08+5:30

गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत बोलवू नये. मात्र, शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासह अन्य शैक्षणिक कामे ...

Guruji's attendance in school as per government order | शासनाच्या आदेशानुसार शाळेत गुरुजींची हजेरी

शासनाच्या आदेशानुसार शाळेत गुरुजींची हजेरी

गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत बोलवू नये. मात्र, शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासह अन्य शैक्षणिक कामे करावीत, अशी सूचना शिक्षण विभागाने दिली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले. त्याचा लेखी आदेश मिळाला नसल्याने दि.१५ जून रोजी शिक्षक सकाळी शाळेत आले. शिक्षण विभागाने पुन्हा सुधारित आदेश काढल्याने दुपारनंतर ते घरी गेले. अशा गोंधळाच्या वातावरणात शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. त्यानंतर शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. कोरोना ड्युटी केली. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑगस्टपासून त्यांची शाळेतील उपस्थिती वाढली. नोव्हेंबरमधील अखेरच्या आठवड्यापासून पुढे टप्प्याटप्प्याने इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू झाला. त्यावेळी कोरोना ड्युटीतील शिक्षक वगळता अन्य शिक्षकांची शंभर टक्के हजेरी राहिली.

पॉंईंटर

जिल्ह्यात शाळा आणि शिक्षक

प्राथमिक शाळा : १९७७

शिक्षक : ८०००

माध्यमिक शाळा : १०५०

शिक्षक : ८५००

शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया

गेल्यावर्षी शासन आदेशानुसार जून, जुलैमध्ये माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम केले. त्यानंतर शाळांमध्ये त्यांची शंभर टक्के उपस्थिती राहिली.

-किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी.

कोरोनाकाळात शासनाने सोपविलेली जबाबदारी सांभाळून प्राथमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे काम केले. शासन निर्देशानुसार त्यांची शाळांमध्ये उपस्थिती होती.

-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.

शिक्षकांच्या प्रतिक्रिया

कोरोना ड्युटी सांभाळून आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. ऑनलाइन शिक्षणाबाबत पालकांकडून तक्रारी झाल्या नाहीत. मात्र, ऑनलाइन शिक्षणासाठी साधने उपलब्ध नसल्याची अडचण त्यांच्याकडून सांगण्यात आली.

-लक्ष्मी पाटील.

शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार गेल्यावर्षी कोरोना काळात आम्ही शाळेमध्ये हजर राहून काम केले. ऑनलाइन शिक्षण देण्यासह अन्य शैक्षणिक कामांची पूर्तता केली.

-अरविंद कांबळे.

चौकट

कोरोना ड्युटीमधील कामे

कोरोना ड्युटीवर असलेल्या शिक्षकांनी विविध कामांची जबाबदारी पार पाडली. त्यामध्ये कोरोना सर्वेक्षणाअंतर्गत नागरिकांच्या ऑक्सिजन, तापमानाच्या नोंदणी ठेवणे. कोरोना नियमांच्या पालनाबाबत जनजागृती करणे. आरोग्यकेंद्रात रुग्णांचे बेड लावणे. स्वॅॅब रिपोर्टची ऑनलाइन नोंदणी करणे आदी कामांचा समावेश होता.

===Photopath===

160621\16kol_6_16062021_5.jpg

===Caption===

डमी (१६०६२०२१-कोल-स्टार ८१६ डमी)

Web Title: Guruji's attendance in school as per government order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.