गुरुजींचा राडा

By Admin | Updated: August 24, 2015 00:35 IST2015-08-24T00:35:28+5:302015-08-24T00:35:41+5:30

शिक्षक बँक सभा : कपडे फाटेपर्यंत मारहाण; खुर्ची, चप्पल फेकाफेक; अर्वाच्च शिवीगाळ

Guruji Rada | गुरुजींचा राडा

गुरुजींचा राडा

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ व विरोधक यांच्यात राडा झाला. यावेळी कपडे फाटेपर्यंत शिक्षकाला मारहाण करण्यात आली, तर अर्वाच्च शिवीगाळ, खुर्ची, चप्पलांच्या फेकाफेकीमुळे सभेला आखाड्याचे स्वरूप आले होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील होते.
शिक्षक बॅँकेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केली होती. बॅँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन भारते यांनी विषयपत्रिकेवरील पहिल्या विषयाचे वाचन सुरू केले. यावेळी मागील प्रोसीडिंगच्या सविस्तर वाचनाची मागणी विरोधकांनी केली, तर त्यांना रोखत हा विषयच मंजूर करावा, असा सत्तारूढ गटाने आग्रह धरल्यानंतर एकच गोंधळ उडाला. एकमेकाला रोखण्याचा प्रयत्न झाल्याने गोंधळात भर पडली. प्रोसीडिंगचे सविस्तर वाचन केले जाईल, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. परंतु, गोंधळ सुरूच राहिला. यावेळी व्यासपीठाच्या डाव्या कोपऱ्यातून खुर्ची फेकल्यानंतर जोरदार गोंधळ उडाला. सत्तारूढ व विरोधक एकमेकांसमोर आल्यानंतर धक्काबुक्की सुरू झाली आणि गोंधळातच सर्व विषय मंजूर करत ‘वंदे मातरम्’ सुरू करण्यात आले. यानंतर सभा गुंडाळल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधी प्रसाद पाटील, जोतिराम पाटील, कृष्णात कारंडे यांच्या समर्थकांनी आक्रमक होऊन संचालकांच्या धिक्काराच्या घोषणा द्यायला सुरू केल्या. सत्तारूढ राजाराम वरुटे यांच्या समर्थकांनी विजयाच्या घोषणा देत सर्व विषय मंजूर मंजूरच्या घोषणा सुरू केल्या. विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीर मुद्द्यावर कोणतीही चर्चा होणार नाही असे सांगत अखेरची खीळ घातली. आपण सामोरे जाण्याऐवजी केवळ माघारच घेत आहोत, असे हुरियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाईज उमर फारूक यांनी सांगितले. चर्चा ऐनवेळी रद्द झाल्याने आमची निराशा झाली, पण दोन्ही देशांनी लवकरच पुन्हा चर्चा करावी, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

...आणि अनर्थ टळला
मागील पाच सभांचा अनुभव पाहता यावेळेला बॅँकेने पोलीस बंदोबस्त मागविला नव्हता. यावेळी मात्र तब्बल दोन तास गोंधळ सुरू होता, हाणामारी झाली, तरीही पोलिसांना बोलविण्याच्या मन:स्थितीत कोणीही नव्हते. एका गटाचे समर्थक विटा व दगड घेऊनच व्यासपीठावर बसले होते. सोशल मीडियावर गुरुजींचा राडा पाहून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले आणि पुढील अनर्थ टळला.
‘पुरोगामी’च्या समर्थकानेच चप्पल फेकली
गोंधळ सुरू असताना पहिल्यांदा चप्पल कोणी फेकली, हे व्हिडीओ कॅमेऱ्यात पाहा. पुरोगामी शिक्षक समितीच्या करवीरमधील एका कार्यकर्त्याने चप्पल फेकल्यानंतर गोंधळ वाढल्याचा आरोप राजाराम वरुटे यांनी केला.
मंजूर, नामंजूर !
सभा गुंडाळल्यानंतर सत्तारूढ व विरोधकांमध्ये घोषणायुद्ध रंगले. सत्तारूढ समर्थकांनी मंजूर, तर विरोधकांनी नामंजूर असा एकसारखा गजर सुरू केला.
...तर राजीनामा देईन
अहवालात चार कोटींची तरतूद लपवून ठेवून नफा दाखवला आहे. पुनर्लेखापरीक्षण केल्यास हे पाप उघडकीस येईल. तसे झाले नाही तर दुसऱ्या दिवशी संचालकपदाचा राजीनामा देईन; पण नफा खोटा ठरला तर संचालकांनी राजीनामे द्यावेत, असे आव्हान लक्ष्मी पाटील यांनी दिले.

 

Web Title: Guruji Rada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.