शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
3
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
4
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
5
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
6
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
7
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
8
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
9
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
10
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
11
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
12
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
13
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
14
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
15
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
16
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
17
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
18
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
19
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
20
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

Datta Jayanti 2025: दत्त नामाचा गजर, भाविकांच्या गर्दीत नृसिंहवाडीमध्ये भक्तीमय वातावरणात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:50 IST

Nrusinhawadi Datta Jayanti 2025 Celebration: मार्गशीष गुरुवार आणि दत्त जयंतीचा दुग्धशर्करा योग एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी 

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी: श्री दत्त जयंती निमित्त अखंड दत्त नावाने श्री क्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमली व दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा व पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात श्रीदत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता दत्तजन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मार्गशीष गुरुवार आणि दत्त जयंतीचा दुग्धशर्करा योग एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.दत्त जयंती निमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे तीन वाजता काकड आरती, षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा केली. दुपारी साडेबारा वाजता श्रींचे चरण कमलावर महापूजा संपन्न झाली.महापूजा नंतर भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला.दुपारी तीन वाजता येतील ब्रह्मवृंदामार्फत पवमान पंचसुतांचे पठण करण्यात आले साडेचार वाजता श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली. ह भ प काने बुवा कवठेगुलंद यांच्या कीर्तनानंतर ठीक पाच वाजता धार्मिक वातावरणात असंख भाविक व ब्रह्मबंध यांच्या उपस्थितीत विधी व श्री दत्तजन्मकाळसोहळा संपन्न झाला. फुलांनी सजवला होता पाळवाजन्म काळासाठी चांदीचा पाळणा विविध फुलांनी आकर्षक सजवण्यात आला होता. उपस्थित भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुलांचे मुक्तहस्ताने उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपारिक पाळणा गीते व आरत्या म्हणण्यात आल्या व प्रार्थना करण्यात आली. रात्री १० नंतर धूपदीप आरती व पालखी सोहळा संपन्न होणार आहे.दत्त जयंती निमित्त पालखी व दत्त मंदिर परिसर पुणे येथील कुलकर्णी परिवार यांनी आकर्षक फुलांनी सजविला होता. उत्सवाचे मानकरी विनोद भानुदास पुजारी यांच्या गणेश दत्त कुंज येथे भाविकांना दर्शनासाठी जन्म काळाचा पाण्यात ठेवण्यात आला. जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा  राज्यातून भक्तगण आले होते. अनेकजण पहाटेच्या थंडीत ही चालत आले होते. सायकलवरून देखील येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. भाविकांसाठी देवस्थानमार्फत सोयी, सुविधा भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देवस्थान मार्फत अनेक सोयी व सुविधा उपलब्ध केल्या होत्या मंदिर परिसरात ठीक ठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही, दर्शन रंगाची उत्तम व्यवस्था तसेच मुखदर्शन व्यवस्था दुपारच्या वेळेस भाविकांसाठी महाप्रसाद वाटप, जन्म काळानंतर सुंठवडा प्रसाद वाटप, सूचनाफलक, ध्वनिक्षेपक यंत्रणा तसेच नदीचा काठ असल्याने तीरावर पट्टीचे पोहणारी युवक तसेच सुरक्षिततेसाठी इनर ट्यूबची व्यवस्था करण्यात आली होती. जादा बसेसची सोय एसटी खात्यामार्फत गर्दीचे नियोजन करण्यासाठी कुरुंदवाड सांगली आजरा कोल्हापूर संभाजीनगर कागल चिकोडी इचलकरंजी आधी ठिकाणाहून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. पोलीस तसेच गृहरक्षक दलाच्या सहकार्याने पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. देवस्थान व ग्रामपंचायत कर्मचारी व स्वयंसेवक यांनी यात्रेचे नेटके नियोजन केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Datta Jayanti Celebrated with Devotion in Nृsinghwadi, Huge Crowd Gathered.

Web Summary : Nृsinghwadi witnessed a grand Datta Jayanti celebration with thousands of devotees. The Krishna-Panchganga Sangam reverberated with chants as the Datta Janma ceremony took place. The temple was beautifully decorated, and facilities were provided for devotees from various states. Special bus services and security arrangements were in place.