गनबावडा 'डी. वाय.'ची हंगाम अखेरची ऊस बिले अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:28+5:302021-05-09T04:25:28+5:30
ते पुढे म्हणाले, कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या १८ व्या गळीत हंगामात कारखान्याने चार लाख ९३ हजार ९६३ मे. टन ...

गनबावडा 'डी. वाय.'ची हंगाम अखेरची ऊस बिले अदा
ते पुढे म्हणाले, कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या १८ व्या गळीत हंगामात कारखान्याने चार लाख ९३ हजार ९६३ मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२.५० टक्के साखर उताऱ्याने सहा लाख १७ हजार ६०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. आजरोजी १ मार्च ते हंगाम अखेर गाळपास आलेल्या २३ हजार ३९४ मे. टनाचे प्रति मे. टन २९०० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम पाच कोटी ३० लाख २५ हजार ६९७ संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत.
कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसास पहिल्या हप्त्यापोटी २९०० रुपये अदा केले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या उसापोटी जास्तीत जास्त दर देता यावा याकरिता कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे.
०८ सतेज पाटील यांचा फोटो