इचलकरंजी प्रांत कार्यालय परिसरात गुलमोहराचे झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:30+5:302021-07-22T04:16:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील प्रांत कार्यालय परिसरात असलेले गुलमोहराचे झाड बुधवारी दुपारी उन्मळून पडले. बकरी ईदनिमित्त सुट्टी ...

इचलकरंजी प्रांत कार्यालय परिसरात गुलमोहराचे झाड कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील प्रांत कार्यालय परिसरात असलेले गुलमोहराचे झाड बुधवारी दुपारी उन्मळून पडले. बकरी ईदनिमित्त सुट्टी असल्याने कार्यालय बंद होते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. तत्काळ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे झाड हटवले.
शहर व परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर आहे. काही ठिकाणी सखल भाग असल्याने पाणी साचून राहत आहे. त्यामुळे जमीन भुसभुशीत झाली आहे. प्रांत कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत असलेले गुलमोहराचे झाड दुपारच्या सुमारास जमिनीवर कोसळले. याची माहिती मिळताच कर्मचारी तत्काळ दाखल झाले. त्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाड तेथून हटवले. कार्यालयाला सुट्टी असल्याने याठिकाणी नागरिकांची वर्दळ नव्हती. कामाच्या दिवशी कार्यालयात नागरिकांची नेहमीच गर्दी असायची. झाड पडलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग करण्यात येत होती. मात्र, कार्यालय बंद असल्याने सर्वत्र शांतता होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
फोटो ओळी
२१०७२०२१-आयसीएच-०६
इचलकरंजी प्रांत कार्यालय परिसरात गुलमोहराचे झाड कोसळले.
छाया-उत्तम पाटील