गुजरी, महाद्वार परिसराला सोन्याचे भाव
By Admin | Updated: January 2, 2015 00:09 IST2015-01-01T23:56:30+5:302015-01-02T00:09:59+5:30
बाजारमूल्य दरतक्ता जाहीर : तत्काळ अंमलबजावणी

गुजरी, महाद्वार परिसराला सोन्याचे भाव
कोल्हापूर : नवीन वर्षातील बाजारमूल्य दरतक्त्याप्रमाणे (रेडिरेकनर) शहरातील महाद्वार रोडसह गुजरी परिसरातील जागेच्या दरात सरासरी २० ते २८ हजार प्रती चौरस मीटरपर्यंतची वाढ होणार आहे, तर उपनगरांसह झोपडपट्टी परिसरातील जागेच्या दरात पाचशेपासून दोन हजार रुपयांचा फरक पडणार आहे. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी यांनी आज, गुरुवारपासून नवीन वर्षाचा बाजारमूल्य दरतक्ता (रेडिरेकनर) जाहीर केला. शहरातील जागेच्या शासकीय दरात १५ ते २५, तर ग्रामीण भागात ५ ते १५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. नवा दर तत्काळ अंमलात येणार आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी मंदिर, गुजरी परिसर, भाऊसिंगजी रोड परिसर, महाद्वार रोड या परिसरात रेडिरेकनरप्रमाणे सरासरी सरासरी ३१ हजार रुपये प्रती चौ.मी. जागेचा दर होता. नवीन वर्षात त्यात मोठी वाढ होऊन येथील दर ४५ ते ५८ हजारांपर्यंत जाईल. बिनखांबी परिसरातील सरसरी ३० ते ३६ चौ.मी. हजार रुपये दर सरासरी ४० हजारांचा टप्पा पार करेल. राजारामपुरी परिसरातील २० ते २६ हजारांपर्यंत असलेल्या दरासाठी आता प्रती चौरस मीटरसाठी ३० ते ३५ हजारांपर्यंत शासकीय दरसूचीप्रमाणे पैसे मोजावे लागतील. झोपडपट्टीसह उपनगरांतील परिसरात यापूर्वी खुल्या जागेसाठी १२०० रुपये असणारा दर आता दोन हजार रुपयांपर्यंत होईल. राजारामपुरी व स्टेशन रोड परिसरात खुल्या व बांधलेल्या मिळकतींच्या रेडिरेकनरमध्ये पाच ते २० हजारांचा फरक आहे. (प्रतिनिधी)
जुने मुद्रांक चार महिने
नव्या दराचा १ जानेवारीपासून अंमल होणार आहे. ३१ डिसेंबरअखेर खरेदी केलेला मुद्रांकावर व्यवहाराचा तपशील लिहून सही केलेला मुद्रांक जुन्या रेडिरेकनर दरानेच ३० एप्रिल २०१४ पर्यंत चालेल.
- पी. डी. शेळके (जिल्हा मुद्रांक अधिकारी)
व्यवहार कमी होतील
शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. मंदीमुळे अगोदरच सर्वच स्थावर व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. या नव्या दरवाढीमुळे व्यवहारावर आणखी परिणाम होऊन व्यवहार कमी होतील. त्याचा फटका महसुलावरच पडेल.
- अॅड. जीवन पाटील
उपनगरांची भरारी
उपनगरांतील दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. नाळे कॉलनी परिसरात रेडिरेकनरचा दर सरासरी ९५४० हजार रुपये प्रती चौ. मी. होईल. याचप्रमाणे शहाजी वसाहत, तपोवन, देवकर पाणंद, साने गुरुजी वसाहत, नवीन वाशीनाका परिसर, साळोखे नगरातील दरामध्ये मोठी वाढ झाली आहे.
करवीर तालुक्यातील बालिंगा येथील शेतीसाठी ११८२००० प्रति हेक्टरी, तर १८०० प्रति चौ.मी खुल्या जागेसाठी मोजावे लागतील. कळंबा परिसरात शेती १४४७००० प्रति हेक्टरी, तर १६२० प्रति चौ.मी. खुल्या जागेचा दर असणार आहे.
नवा रेडिरेकनर दर (दर प्रती चौ.मीटर)
परिसर खुली जागा बांधकाम
जुना दरनवा दरजुना दरनवा दर
शाहूपुरी१४३१०२२३९०३१६३०४०५९०
बिनखांबी मंदिर२१०००३०५१०२८२५०३६४३०
महाद्वार रोड२९३००४०३१०३४४००४६०३०
गुजरी४००००५८४००५२६४०५३९२०
शिवाजी पेठ८९००११२००२८७१०३३०२०
साने गुरुजी३२४००३६०००२३४९०२९५००
साळोखेनगर परिसर२३८००३१३००२८७१०३५०००
स्टेशन रोड३०५१०३५१६०३६४१०४१८८०
राजारामपुरी२७६२०३७२००३५२९०४३९८०
ताराबाई पार्क१९०००२२४२०३१०००३८३५०
नागाळा पार्क २१२४०२५६००३७७६०४५३००
कदमवाडी परिसर४४००५२००३०३९०३५७५०
क।। बावडा परिसर२१३५०२५७०० २८२५०३२३४०