शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील व्यापाऱ्यांप्रमाणे आता रस्त्यावर उतरा, अशोक चव्हाण यांचे आवाहन; व्यापारी-उद्योजकांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 17:49 IST

कोल्हापूर : तुमचे प्रश्नांना राज्य आणि केंद्राच्या पातळीवर वाचा फोडली जाईल. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, यासह तुम्ही आता गुजरातमधील व्यापाऱ्यांप्रमाणे रस्त्यावर उतरावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरातील उद्योजक, व्यापाऱ्यांना शुक्रवारी केले. येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित व्यापारी-उद्योजक यांच्याशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पॅव्हेलियन हॉटेलमधील कार्यक्रमास आमदार पतंगराव कदम, आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देकोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित व्यापारी-उद्योजक यांच्याशी संवाद प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना दिले जिल्ह्यातील उद्योजक, व्यापाऱ्यांच्या संघटनांनी प्रश्नांचे निवेदन

कोल्हापूर : तुमचे प्रश्नांना राज्य आणि केंद्राच्या पातळीवर वाचा फोडली जाईल. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, यासह तुम्ही आता गुजरातमधील व्यापाऱ्यांप्रमाणे रस्त्यावर उतरावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरातील उद्योजक, व्यापाऱ्यांना शुक्रवारी केले.

येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित व्यापारी-उद्योजक यांच्याशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पॅव्हेलियन हॉटेलमधील कार्यक्रमास आमदार पतंगराव कदम, आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, व्यापाऱ्यांच्या संघटनांनी आपल्या प्रश्नांचे निवेदन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना दिले.

संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधींनी या अनुषंगाने मुद्दे मांडले. यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, भाजप सरकारच्या गेल्या तीन वर्षांमध्ये राज्यात काय घडले याचे दर्शन हे उद्योजक, व्यापाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्न, समस्यांतून दिसते. आता काँग्रेसचे सरकार असते, तर हे प्रश्न एका दिवसात सोडविले असते. भाजप सरकारकडून उद्योजक, व्यापारीवर्गाची पिळवणूक सुरू आहे. त्यांचे प्रश्न सरकारला सोडविता आलेले नाहीत. अशीच स्थिती गुजरातमध्ये असल्याने त्याठिकाणी सरकारविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले.

आता महाराष्ट्रातील प्रश्न कठीण होत आहेत. ते लक्षात घेऊन उद्योजक, व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरावे. या लढ्यात आम्ही तुमच्यासोबत राहू, तुम्ही सांगाल ते केले जाईल. तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेसचे खासदार, आमदार प्रयत्न करतील.

या कार्यक्रमात नयन प्रसादे, तौफिक मुल्लाणी, सुभाष जाधव, सदानंद कोरगांवकर यांनी उद्योजक-व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. राजीव परिख, जयेश ओसवाल, सुरजितसिंग पवार, वैभव सावर्डेकर, सचिन शहा, शिवाजीराव पोवार, आदी उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष आनंद माने यांनी प्रास्ताविक केले. आमदार सतेज पाटील यांनी आभार मानले.

उद्योजक, व्यापाऱ्यांच्या अपेक्षा, मागणी

  1.  ललित गांधी : देशाची आर्थिक घडी चांगली बसण्यासाठी उद्योजक-व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. 
  2. आनंद माने : नोटाबंदी, जीएसटीनंतर उद्योग, व्यापार क्षेत्रात अनिश्चितता आली आहे. ती दूर होण्यासाठी काँग्रेसकडून पाठपुरावा व्हावा. 
  3. राजू पाटील (अध्यक्ष, स्मॅक) : मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश व्हावा. वीज दरवाढीचे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावे.
  4. महेश यादव (अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर) : ‘ड’वर्ग महापालिकेमधील नियमावली चुकांची दुरुस्ती, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न करावेत. आमचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडावेत. 
  5. संजय शेटे (उपाध्यक्ष, केमिस्टस् असोसिएशन) : मुदतबाह्य औषधांबाबतचा मुद्दा निकालात काढण्यासाठी पाठपुरावा करावा. 
  6. भरत ओसवाल (अध्यक्ष, जिल्हा सराफ संघ) : सोने-चांदी व्यावसायिकांबाबतचा एलबीटीचा मुद्दा निकालात काढण्यात यावा. कन्व्हेंशन सेंटर व्हावे.

 

 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणkolhapurकोल्हापूर