शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

जागतिक विक्रम-कोल्हापूरच्या प्रणवने चार मिनिटे पेलला गुडघ्यावर फुटबॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 18:48 IST

कोल्हापूरच्या प्रणव भोपळे याने लाँगेस्ट टाईम बॅलन्सिंग अ फुटबॉल* ऑन नी या फ्री स्टाईल फुटबॉल प्रकारामध्ये जागतिक विक्रम नोंदविला. त्याने चार मिनिटे २७ सेकंदांपर्यंत फुटबॉल गुडघ्यावर पेलला.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या प्रणव भोपळेची फ्री स्टाईल फुटबॉलमध्ये गिनीज बुकात नोंदद ब्रीज उपक्रमास पहिले यश

 कोल्हापूर : कोल्हापूरच्या प्रणव भोपळे याने लाँगेस्ट टाईम बॅलन्सिंग अ फुटबॉल ऑन नी या फ्री स्टाईल फुटबॉल प्रकारामध्ये जागतिक विक्रम नोंदविला. त्याने चार मिनिटे २७ सेकंदांपर्यंत फुटबॉल गुडघ्यावर पेलला. यापूर्वी बांगलादेशच्या कोनोक कर्माकर याच्या नावावर या जागतिक विक्रमाची नोंद होती. त्याने चार मिनिटे ६ सेकंदांपर्यंत चेंडू पेलला होता. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. १५) सायंकाळी पाच वाजता सावली केअर सेंटरमध्ये हा विक्रम प्रस्थापित केला. यासाठी त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार अधिकृत साक्षीदार म्हणून करवीर तालुका क्रीडाधिकारी सचिन चव्हाण यांनी, तर टाईमकिपर म्हणून  शिवानंद पूयम यांनी काम पाहिले. या विक्रमाची नोंद व चित्रीकरण संकेत रणदिवे व सावलीचे किशोर देशपांडे आणि सर्व सहकाऱ्यांचे सहाय्य त्याला लाभले.प्रणव गेल्या दीड वर्षांपासून हा विक्रम मोडण्याचा सराव करत होता. कोल्हापूरमध्ये हा क्रीडा प्रकार पूर्णपणे नवीन असल्याने त्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षक उपलब्ध झाला नाही. त्याने गुगल, युट्यूबच्या सहाय्याने विविध माहिती गोळा करून एकलव्यासारखा आपला सराव सुरू ठेवला होता. प्रणवच्या आई-वडील आणि मोठा भाऊ यांच्यासह प्रसिद्ध फुटबॉलपटू अनिकेत जाधव याने त्याला वेळोवेळी प्रेरणा दिलीसराव करताना प्रणवला काही अडचणींना तोंड द्यावे लागले. यासाठी ह्यसावली केअर सेंटरह्ण ने सुरू केलेल्या ह्यद ब्रीजह्ण या उपक्रमाबद्दल माहिती मिळाली. संस्थेला भेट देत असताना त्याला ह्यब्रीजह्णमध्ये स्पोर्टस्‌ फिजिओथेरपिस्ट, हायड्रो थेरपी, सायकॉलॉजिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट यांची उपलब्धता असल्याचे त्याला कळले.

एकाच छताखाली या सर्व सुविधा मिळाल्या. संस्थेचे डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी त्याचा स्टॅमिना बिल्डिंग, लोअर लिंब/कोअर मसल्स डेव्हलपमेंट, श्वासावर नियंत्रण आदी बाबींचा व्यायाम व सराव घेतला. ब्रीजच्या आहारतज्ज्ञ डॉ. विद्या कुलकर्णी व डॉ. राजकुमारी नायडू यांची हायड्रो थेरपी, तर मानसशास्त्रज्ञ भूषण चव्हाण यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर