ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेवर जयसिंगपुरात मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:07+5:302021-01-03T04:26:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात होत असलेल्या ३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी ...

ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेवर जयसिंगपुरात मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात होत असलेल्या ३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीनसह मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्वांनी कर्तव्याचे पालन करुन निवडणुकीच्या कामामध्ये अजिबात टाळाटाळ करु नये. काही अडचणी असल्यास संपर्क साधावा, अशा सूचना तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी केल्या. दरम्यान, ८ जानेवारीला पुन्हा प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
येथील स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात निवडणुकीच्या अनुषंगाने हे प्रशिक्षण पार पडले. तालुक्यात २४५ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी २३० केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार डॉ. मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संपूर्ण मतदान प्रक्रिया, त्यानंतर मतदान साहित्य स्वीकारणे, केंद्राध्यक्षांचे कर्तव्य आणि कामाचे स्वरुप, मतदानासंबंधीची सर्व अद्ययावत माहिती यावेळी देण्यात आली. मतदान साहित्य जमा करण्यापर्यंतचे सर्व टप्पे व्यवस्थितपणे सांगण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही देण्यात आली. यावेळी सुजय हलवाई यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर केले. व्हिडीओचा वापर करुन सर्व मतदान प्रक्रिया प्रशिक्षणार्थींना समजावून सांगण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके, उपअधीक्षक भूमी अभिलेख सुवर्णा मसणे, नायब तहसीलदार संजय काटकर, पी. जी. पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - ०२०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे शनिवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.