कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर डीवायपीमध्ये मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST2021-05-22T04:23:25+5:302021-05-22T04:23:25+5:30

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय. या ...

Guidance in DYP against the backdrop of the third wave of corona | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर डीवायपीमध्ये मार्गदर्शन

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर डीवायपीमध्ये मार्गदर्शन

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय. या पार्श्वभूमीवर लहान मुलांवर योग्य आणि वेळेत उपचार व्हावेत, यासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे आयोजित कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचा इशारा आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. यामध्ये लहान मुलांमध्ये दिसणारी लक्षणे व त्यावर कोणते उपचार, कशापद्धतीने करावयाचे, याबाबत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल बालरोग विभागाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी कदमवाडी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये काम करणारे बाल रोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ यांना कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमधील उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत माहिती दिली. या कार्यशाळेला डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे डॉ. बी. सी. पाटील, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे बालरोग विभागप्रमुख डॉ. अनिल कुरणे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Guidance in DYP against the backdrop of the third wave of corona