भादोलेत कृषिपंप वीजजोडणी धोरणाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:45+5:302021-02-05T07:05:45+5:30
कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत नवीन कृषिपंप वीजजोडणी देण्याचे धोरण, कृषिपंप थकबाकीमध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माफीची माहिती देण्यात आली. ...

भादोलेत कृषिपंप वीजजोडणी धोरणाबाबत मार्गदर्शन
कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० अंतर्गत नवीन कृषिपंप वीजजोडणी देण्याचे धोरण, कृषिपंप थकबाकीमध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माफीची माहिती देण्यात आली. कृषिपंप थकबाकी व वीज देयके ग्रामपंचायतीने भरणा करून घेतल्यास ग्रामपंचायतीस मिळणाऱ्या विविध लाभाबाबत महावितरणकडून अवगत करण्यात आले तसेच वीजदेयके भरणा अंतिम तारखेपर्यंत केल्यास कृषिपंप ग्राहकांना मिळणाऱ्या कृषिपंप वीजदेयक महसुलामधून ग्रामपंचायतीस, गावास मिळणाऱ्या सवलती, प्रोत्साहन रकमेबाबत ग्रामपंचायत प्रशासनास अवगत करण्यात आले. या सर्व सुविधा, योजनांमुळे ग्रामपंचायत कार्यालयाने वीजबिल भरणा केंद्र मंजूर करून घ्यावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले. विद्युत सुरक्षिततेचे महत्त्व उपकार्यकारी अभियंता सचिनकुमार जगताप, सहाय्यक अभियंता शरदकुमार संकपाळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच आनंदराव कोळी, ग्रामविकास आघाडीचे नेते धोंडीराम पाटील, अनिल जामदार, विक्रम माने, सचिन नांगरे आदींसह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.