शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Gudhi padwa 2018 कोल्हापूर : गुढीपाडव्याची लगबग सुरू, साखरेच्या गाठींनी बाजारपेठेला गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 19:57 IST

हिंदू नववर्षारंभ असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दाखल झालेल्या साखरेच्या गाठींनी (माळा) कोल्हापुरातील  बाजारपेठेलाही गोडवा आला आहे. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या या सणासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे.

ठळक मुद्देगुढीपाडव्याची लगबग सुरू साखरेच्या गाठींनी बाजारपेठेला गोडवा

कोल्हापूर : हिंदू नववर्षारंभ असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दाखल झालेल्या साखरेच्या गाठींनी (माळा) कोल्हापुरातील  बाजारपेठेलाही गोडवा आला आहे. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या या सणासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे.हिंदू पंचांगांनुसार चैत्र महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यानुसारच वर्षातील सगळे सण साजरे होतात, म्हणून या महिन्याच्या पहिल्या दिवशी येणारा गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला आणि पूर्ण मुहूर्त म्हणूनही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

वसंतऋतूचे आगमन आणि सृजनाचा आनंदोत्सव असलेल्या यादिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीला व देवतांना साखरेच्या माळा घालून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. आरोग्यदायी जीवनाचा संदेश देत संस्कृतीतून कडुलिंबाचे महत्त्व सांगितले जाते.

यानिमित्त कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, मिरजकर तिकटी, टिंबर मार्केट या बाजारपेठेत साखरेच्या माळांची मोठी आवक झाली आहे. विविध रंगांतील या माळा दहा रुपयांपासून उपलब्ध आहेत. गुढी उभारण्यासाठी लागणारी चिव्याची काठी ८० रुपयांपासून उपलब्ध आहे.यादिवशी कौटुंबीक समारंभ, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय-उद्योगाचा शुभारंभ अशी मंगलकार्ये केली जातात. त्यामुळे कपड्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. मुहूर्ताची खरेदी करत प्रत्येक घरात एका तरी नवीन वस्तूचे आगमन होते.

सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीकडे नागरिकांचा ओढा असल्याने विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बुकिंगसाठीही मोठी गर्दी होत आहे. दुसरीकडे कंपन्यांनीही ग्राहकांसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.

 

 

टॅग्स :Gudhi padwa 2018गुढीपाडवा 2018kolhapurकोल्हापूर