गुडाळेश्वर पतसंस्थेची कूर येथे नवीन शाखा सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:25 IST2021-09-19T04:25:01+5:302021-09-19T04:25:01+5:30
दुर्गमानवाड : श्री गुडाळेश्वर ग्रामीणबिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या ४० व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना पंधरा ...

गुडाळेश्वर पतसंस्थेची कूर येथे नवीन शाखा सुरू करणार
दुर्गमानवाड : श्री गुडाळेश्वर ग्रामीणबिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या ४० व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंड जाहीर करून १ कोटी १३ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. संस्था भुदरगड तालुक्यातील कूर येथे नवीन शाखा सुरू करणार असल्याची माहिती अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.
गुडाळ (ता. राधानगरी) येथील ए. डी. पाटील सभागृहात गुडाळेश्वर पतसंस्थेची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संस्थेकडे ४९ कोटी ठेवी असून, २७ कोटी कर्ज वाटप केले आहे. संस्थेची बँकेकडे २७ कोटींची गुंतवणूक असून, भागभांडवल ३ कोटी १३ लाख आहे. संस्थेची एकूण उलाढाल २२० कोटी झाली असून, ७६ कोटी व्यवसाय झाला आहे. तो शंभर कोटी करण्याचा मानस आहे, असा आढावा पाटील यांनी घेतला. ऑनलाईन वार्षिक सभेत संस्थेचे मॅनेजर डी. जी. पाटील यांनी अहवाल वाचन केले. त्यामध्ये रंगराव हुजरे, चंद्रकांत डोंगळे, शांताराम चरापले, सुरेश साबळे, प्रदीप भालेराव, बाजीराव मोरे, रवींद्र खाडे, कृष्णात साळोखे, अशोक पाटील, दत्ता पाटील, प्रकाश चरापले आदींनी सहभाग घेतला.
सभेस संस्थापक ए. डी. पाटील, उपाध्यक्ष ईश्वरा पाटील, सदस्य हिंदुराव पाटील, पांडुरंग जाधव, दीपक चरापले, दत्तात्रय पोवार आदी सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. आभार अनंत तेली यांनी मानले.