पालकमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार
By Admin | Updated: January 13, 2015 00:06 IST2015-01-12T23:43:19+5:302015-01-13T00:06:03+5:30
तानाजी आंग्रे यांची माहिती : करवीर पंचायत समिती इमारतीसाठी जागेचा प्रश्न

पालकमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार
कसबा बावडा : करवीर पंचायत इमारतीसाठी शहरात प्रशस्त अशी जागा मिळावी, या मागणीसाठी पुढील आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेण्याचे निश्चित झाले असल्याचे समिती सदस्य तानाजी आंग्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या सभेत इमारतीसाठी जागा मिळावी, असा ठराव झाला होता. या ठरावाची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला कळविण्यात आली असल्याचे गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी सांगितले.
सध्या आंग्रे हे पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ निश्चित करीत आहेत. आंग्रे यांच्या म्हणण्यानुसार येत्या आठवड्यात पालकमंत्र्यांशी भेटून या जागेचे नेमके दुखणे काय आहे, हे सांगण्यात येणार आहे. सर्वानुमते एखादी जागा मान्य झाल्यास इमारत बांधकाम करण्यास फारसा विलंब लावणार नाही, कारण इमारतीसाठी शासन निधी उपलब्ध करून देते.
दरम्यान, समितीच्या मासिक सभेत वारंवार इमारतीच्या जागेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावेच लागणार आहे. उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी मात्र जिल्हा परिषदेसमोर जागा पंचायतला मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. (प्रतिनिधी)