कोल्हापूर : माझ्या वॉर्डातील एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू होणार नाही, अशा भावनेतून मनापासून काम करा. काही अडचणी असतील, तर सांगा. परंतु कोणत्याही परिस्थितीत इतक्या वाईट परिस्थितीत दुर्लक्ष परवडणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तासच घेतला.पाटील यांनी सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविद्यालयाच्या सर्व विभागप्रमुख आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर सरवदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.पाटील म्हणाले, गेल्यावर्षी आपण सर्वांनी चांगल्या पध्दतीने काम केले आहे. परंतु यंदा काही तरी उणिवा रहात आहेत. एकमेकावर जबाबदारी ढकलून चालणार नाही. कोण सिनिअर, ज्युनिअर असे चालणार नाही. जीवन-मरणाचा विचार करा, दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. आपण कुठे कमी पडतोय, याचे चिंतन करा. कोविडपूर्वी इतर रुग्णसंख्या मोठ्या संख्येने असतानाही चांगले उपचार होत होते. आता कुठे कमी पडत आहोत, याचा शोध घ्या. समाजाचा सीपीआरवरील विश्वास दृढ करा.पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ह्यअधिक दक्षता घेऊन चोवीस तास सेवा देऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू, असा विश्वास उपस्थित विभागप्रमुखांच्यावतीने डॉ. सरवदे, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. विजय बर्गे, डॉ. राहुल बडे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, एकही रुग्ण दगावणार नाही, असे ध्येय प्रत्येकाने ठेवा. माझ्या ड्युटीत एकही मृत्यू होणार नाही, एवढी दक्षता मी बाळगेन, अशी शपथ घ्या.
पालकमंत्र्यांनी घेतला सीपीआरमधील डॉक्टरांचा तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 19:01 IST
CoronaVirus Kolhapur CprHospital : माझ्या वॉर्डातील एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू होणार नाही, अशा भावनेतून मनापासून काम करा. काही अडचणी असतील, तर सांगा. परंतु कोणत्याही परिस्थितीत इतक्या वाईट परिस्थितीत दुर्लक्ष परवडणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तासच घेतला.
पालकमंत्र्यांनी घेतला सीपीआरमधील डॉक्टरांचा तास
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतला सीपीआरमधील डॉक्टरांचा तास कोरोनाचे संकट : समन्वय ठेवून मनापासून काम करण्याचे आवाहन