शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदारांच्या 'नियोजन'वरील बहिष्कारावर पालकमंत्री, खासदार महाडीकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 8, 2024 18:21 IST

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपातील भेदभावामुळे काँग्रेस आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेवर टाकलेल्या बहिष्कारावर पालकमंत्री हसन मुश्रीफ ...

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपातील भेदभावामुळे काँग्रेस आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेवर टाकलेल्या बहिष्कारावर पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडीक यांनी दोन विरोधी वक्तव्यं आज, सोमवारी केली. खासदार महाडीक यांनी हा काँग्रेस नेत्यांचा रडीचा डाव असल्याची टीका केली. तर मंत्री मुश्रीफ यांनी, बहिष्कार नव्हे तर वैयक्तिक कारणामुळे सभेला येणे शक्य नव्हते, म्हणून बहिष्काराचे गोंडस नाव दिले असे मत मांडले.विकास कामांसाठी केवळ १० टक्के निधी दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेस आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेवर बहिष्कार घातला. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, ​​​ बहिष्कार वगैरे काही नाही, माझी कालच आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाली त्यांना एका कामानिमित्त बाहेर जायचे होते, तर पी. एन. पाटील यांचा संगमनेरमध्ये सहकारभूषण पुरस्काराने सन्मान होणार होता. बहिष्काराच्या गोंडस नावाखाली ते निभावून नेत आहेत. यावर पत्रकारांनी त्यांना विरोधी नेते निधीसाठी न्यायालयात जाणार आहेत असे सांगितल्यावर ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी वाटपाचे जे सुत्र होते तेच सुत्र महायुतीच्या काळातही वापरले आहे. गेल्यावेळच्या प्रमाणेच आम्ही निधी दिला आहे. विकास कामांसाठी निधी कमी पडतो हे खरे आहे म्हणूनच दुप्पट रकमेची मागणी करणार आहे. 

खरे तर त्यांना लोकांची कामे करायची नाहीत

खासदार महाडीक म्हणाले, हा बहिष्कार म्हणजे काँग्रेसचा रडीचा डाव आहे. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी १० टक्केच काय १० रुपये आम्हाला मिळाले नाहीत, तेंव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यामुळे आता त्यांना हट्ट करण्याचा किंवा जादा निधी मागण्याचा अधिकार नाही. १० टक्के निधीमध्येसुद्धा कोट्यावधी रुपये मिळतात, अनेक कामे करता येतात. तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे, त्यामुळे बहिष्कार घालणे चुकीचे आहे. लोकप्रतिनिधींनी असे करणे योग्य नाही, खरे तर त्यांना लोकांची कामे करायची नाहीत. लोकांसमोर जायचे नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPlanning Commissionनियोजन आयोगHasan Mushrifहसन मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकcongressकाँग्रेस