शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ‘पालकमंत्री मकान दुकान’ योजना जाहीर, राज्यातील पहिली जिल्हा परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:39 IST

कोल्हापूर : ग्रामीण भागातील महिलांना छोटे किरणा दुकान सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने ‘पालकमंत्री मकान ...

कोल्हापूर : ग्रामीण भागातील महिलांना छोटे किरणा दुकान सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने ‘पालकमंत्री मकान दुकान’ योजना जाहीर करण्यात आली आहे. यातून पात्र २०० महिलांना प्रत्येकी ३० हजार रुपये, असे ६० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ही माहिती दिली असून, अशा पद्धतीची जिल्हा परिषदेने राबविलेली ही पहिलीच योजना असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र यासाठी महाआवास योजनेची सांगड घालण्यात आली आहे.सन २०२५/२६ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास व इतर आवास योजनेमधून ५० हजार घरकूल पूर्ण बांधण्यात येणार आहेत. या घरकुलात राहणाऱ्या, परंतु किराणा दुकान सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी १० टक्के जि.प. स्वनिधीमधून ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. महिलांना घर व उपजीविका यांचा एकत्रित लाभ देणारी अशी ही पालकमंत्री मकान-दुकान योजना आहे.संभाव्य लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला असावी. लाभार्थ्याने १ एप्रिल २०२५ नंतर शासनाच्या कोणत्याही घरकूल योजनेतून १०० दिवसांत घरकूल बांधकाम पूर्ण केलेले असावे. दारिद्र्य रेषेखालील महिला लाभार्थीस प्राधान्य राहील. घरकूल महिलेच्या नावे असावे. सुरू केले जाणारे किराणा दुकान शासकीय योजनेत बांधलेल्या घरकुलात किंवा घरालगत असावे.या दुकानासाठी भांडवल व आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ३० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने मंजुरी दिली जाईल. रक्कम रु. ३० हजार आर्थिक साहाय्य देण्यात येईल. हे दुकान तीन वर्षे सुरू ठेवणे बंधनकारक असून, ते सुरू केल्याचा गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल आवश्यक आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षासाठी ही योजना राबविण्यात येणार असून, ज्या ठिकाणी महिलेचे वास्तव्य असेल त्याच ठिकाणी उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देऊन त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे उद्दिष्ट या योजनेतून साध्य केले जाईल. - कार्तिकेयन एस. सीईओ, जिल्हा परिषद.