शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
5
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
7
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
8
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
9
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
10
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
11
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
12
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
13
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
14
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
15
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
16
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
17
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
18
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
19
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
20
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इचलकरंजी दौरा रद्द, सुळकूड पाणी योजना कृती समितीने विरोध केल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 15:13 IST

सुळकूड पाणी योजनेसंदर्भात मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शहरातील नागरिकांच्या तीव्र भावना

इचलकरंजी : इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. सुळकूड पाणी प्रश्नावर नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने आज, सोमवारी होणारा हा दौरा रद्द केल्याची चर्चा आहे.आयजीएम रुग्णालयात सिटी स्कॅन व अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले आहेत. तसेच नवीन मशीनरी आणण्यात आल्या आहेत. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. २५) होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांनी सांगितले होते. मात्र, तो दिवस रद्द करून पुन्हा सोमवारी ठेवण्यात आला होता. परंतु आता सोमवारीही हा कार्यक्रम होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुश्रीफ यांचा इचलकरंजी दौरा रद्द झाला. सुळकूड पाणी योजनेसंदर्भात मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शहरातील नागरिकांच्या तीव्र भावना होत्या. त्यानंतर आजअखेर मुश्रीफ यांनी इचलकरंजीत प्रवेश केला नाही. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने अण्णा रामगोंडा शाळेसमोरील भाजी मार्केटजवळ एकत्र येत मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे हा दौरा रद्द झाल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीHasan Mushrifहसन मुश्रीफ