शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतराची तयारी, हवी पुनर्वसनाची हमी; कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विकास आराखडा रुळावर 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 28, 2023 13:23 IST

प्रशासनाला रहिवासी, व्यावसायिकांचा सकारात्मक प्रतिसाद

इंदुमती गणेशकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा राबवला जावा, अशी सर्वांचीच भावना आहे. जिल्हा प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना रहिवासी व व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने मंदिराचा रखडलेला विकास होण्याच्या दृष्टीने पावले पडत असल्याचे चित्र आहे. हे करताना आमच्या शाश्वत पुनर्वसनाची हमी द्या, त्यादृष्टीने पावले उचला, आराखडा दाखवा, अशी रहिवासी व व्यावसायिकांची अपेक्षा आहे.मिळकतींच्या संपादनाचे मोठे पाऊल उचलले जात असताना पहिल्यांदा आम्हाला विश्वासात घेतले जात आहे अशी नागरिकांची भावना आहे. दोन्ही बाजूंनी एक एक पाऊल मागे येऊन विचार केला तर वाराणसी व उज्जैननंतर कोल्हापुरातील हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अन्य देवस्थानांसाठी आदर्श ठरणार आहे.अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, जोतिबा रोड, भवानी मंडप, ते बिनखांबी गणेश मंदिर या परिसरातील मिळकतींचे संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वत: आपले पद व प्रतिष्ठा बाजूला ठेवत रहिवासी व व्यापाऱ्यांसोबत दोन वेळा रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. त्यांना तुमचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही असा शब्द दिला. या पार्श्वभूमीवर लोकमतने व्यावसायिक व रहिवाशांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

रहिवाशांना काय वाटते..?येथे अनेक कुटुंब पिढ्यान्पिढ्यांपासून राहत असल्याने मंदिराशी भावनिक नाते आहे. मात्र काळानुरूप येथील कुटुंबांना गोंगाट, पार्किंगला जागा नाही, कूळ कायद्याची प्रकरणे, दावे यांचा त्रासही आहे. त्यामुळे ७० टक्के रहिवाशांनी अन्यत्र स्थलांतराची तयारी दाखवली आहे. मात्र त्यांना मिळकतींचा योग मोबदला हवा आहे. काही कुटूंबामधून देवीचे कुळाचार, नैवेद्य केला जातो त्याबाबत काही निर्णय घ्यावा लागेल.

व्यापाऱ्यांचे मतअंबाबाईच्या सानिध्यात असलेली ही कोल्हापुरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे वर्षानुवर्षे व्यवसाय स्थिरावला असताना दुसरीकडे नवी सुरुवात कशी करायची? तिथे व्यवसाय चालणार का? आम्ही एवढी मोठा धोका पत्करताना त्या प्रमाणत मोबदला मिळणार आहे का? आमच्या मिळकती पुढे फेरीवाले, अतिक्रमणात गेले तर त्याचा उपयोग काय असे अनेक प्रश्न व्यापाऱ्यांच्या मनात आहेत. त्यामुळे याच परिसरात पुनर्वसन व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व व्यावसायिकांनी एकत्र येऊन आपणच प्रशासनाला पर्याय द्यावेत, अशी चर्चा सुरू आहे.

एक पाऊल पुढेमिळकतींच्या संपादनाचा विषय पहिल्यांदा २०११ साली आला, त्यावेळी कोल्हापुरात शब्दश: गदारोळ, टोकाचा विरोध झाला, त्यानंतर आता १० वर्षांनी पून्हा विषय निघाल्यानंतर सर्वांचीच पुनर्वसनाच्या दृष्टीने मानसिकता झाली आहे. संपादीत होणाऱ्या मिळकतींमध्ये रहिवासी किती, व्यावसायिक किती, त्यापैकी अंबाबाई मंदिराशी निगडीत व्यावसायिक किती असे सुक्ष्म सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे. अंदाजानुसार २०० रहिवासी व ३०० ते ४०० व्यावसायिक बाधीत होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन आणि रहिवासी, व्यापारी एकमेकांचा कल जाणून घेत आहेत. इतक्या वर्षात पहिल्यांदा खुलेपणाने चर्चा हाेऊन सकारात्मक पाऊल पुढे पडले हे महत्त्वाचे.

अजित ठाणेकर : प्रशासन आणि नागरिकांनी एक एक पाऊल मागे आल्यास व अन्य पर्यायांचा आराखड्यात समावेश झाला तर हा प्रकल्प शंभर टक्के पूर्णत्वास जाईल याची खात्री आहे. व्यापाऱ्यांच्या पुनर्वनासाठी कपिलतीर्थ मार्केटसह अन्य शासकीय वास्तूंचा विचार व्हावा.

रामेश्वर पत्की : विकास आराखड्याबद्दल सुस्पष्टता नाही, आपल्याला काय मोबदला मिळणार, पुनर्वसन कुठे होणार याबद्दल नागरिकात संभ्रम आहे.

महेश उरसाल : मंदिराशी निगडीत व्यवसाय व अन्य व्यवसाय असा भेद न करता सर्वांना समप्रमाणात मोबदला मिळावा किंवा पुनर्वसन व्हावे.

तज्ञ संस्थेची मागणी मंदिर विकास आराखडा तयार करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तज्ञ संस्थेची मागणी केली आहे. त्याची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांची नियुक्ती झाली की ते विकास आराखडा तयार करणार आहेत. त्यानंतर खरी चर्चा सुरू होईल. पण माऊली लॉजचे संपादन हे आदर्श ठरेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर