महाद्वार ते रंकाळा परिसर विकास व्हावा

By Admin | Updated: June 11, 2016 00:51 IST2016-06-11T00:13:41+5:302016-06-11T00:51:32+5:30

मंदिराचा विकास गरजेचाच : स्थानिकांना विस्थापित करणे योग्य नव्हे...

Growth from Mahadwar to Rankala area | महाद्वार ते रंकाळा परिसर विकास व्हावा

महाद्वार ते रंकाळा परिसर विकास व्हावा

अंबाबाई मंदिर ऐतिहासिक स्मारक म्हणून जपले गेले पाहिजे. पुरातत्त्व वास्तूच्या नियमांनुसार तेथे आधुनिक पद्धतीचे बांधकाम होता कामा नये. अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा हा बिंदू चौक, दक्षिण दरवाजा आणि भवानी मंडप या परिसराभोवतीच फिरत आहे. खरे तर अंबाबाई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार महाद्वार आहे. येथेच बाजारपेठही आहे. महाद्वार ते रंकाळा परिसराचा विकास करून तेथे दर्शन मंडप, पार्किंगसह भाविकांना सोयी पुरविण्यासाठी व्हावा. अंबाबार्ई मंदिर हे मुख्य वस्तीत असल्याने परिसरात गर्दी असणारच. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेसह शहरावर परस्थ भाविकांचा ताण पडायचा नसेल तर रंकाळा येथील महापालिकेच्या जागा, दुधाळी मैदान, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, सरस्वती टॉकीज या जागांचा पार्किंगसाठी उपयोग केला गेला पाहिजे. करोडो रुपये खर्चून दर्शन मंडप बांधण्यापेक्षा ताराबाई रोडवरच कमी खर्चात पत्र्याचा दर्शन मंडप उभारता येईल. महाद्वारातून भाविकांना प्रवेश करता येईल आणि घाटी दरवाजातून बाहेर पडता येईल. मंदिराचा विकास व्हावा यात दुमत नाही; पण परस्थ भाविकांसाठी शेकडो वर्षांपासून राहत असलेल्या स्थानिकांना विस्थापित करणे योग्य नाही. त्यांना विस्थापित करावेच लागत असेल तर त्याच भागात त्यांचे योग्य रीतीने पुनर्वसन झाले पाहिजे.
- इंद्रजित सावंत,
इतिहास संशोधक.


विद्यापीठ हायस्कूल : शाहूंचे शैक्षणिक समारक
येथील विद्यापीठ हायस्कूल हे राजर्षी शाहूंनी निर्माण केलेले शैक्षणिक स्मारक आहे. हे हायस्कूल म्हणजे शाहू महाराजांच्या मातोश्री आनंदीबाई राणीसरकारांचा वाडा होता. येथे अन्नछत्र चालविले जायचे. मात्र, तोफखाने गुरुजींना हा वाडा शाळेसाठी हवा होता. तशी त्यांनी शाहू महाराजांकडे मागणी केली. महाराजांनी होकार दिला. मात्र, वाड्यातील अधिकारी हा वाडा, तोफखाने गुरुजींना देत नव्हते. अखेर भल्या पहाटे शाहू महाराज या वाड्यासमोर जाऊन उभारले आणि कैद्यांकरवी वाडा मोकळा करून घेतला व तोफखाने गुरुजींना दिला. त्यामुळे विकास करताना विद्यापीठ हायस्कूलच्या या इतिहासाचाही विचार केला जावा.

ंमंदिरातून मिळणारे उत्पन्न जनतेसाठी वापरायला हवे
मंदिराचा विकास हा जनतेच्या पैशातून आणि जनतेच्या सोयी-सुविधांसाठी केला जात आहे. त्याचा आर्थिक फायदा फक्त पुजाऱ्यांना होता कामा नये, याचे भान राखले गेले पाहिजे. मंदिरातून मिळणारे उत्पन्न पुन्हा जनतेच्या सोयीसाठी वापरता आले पाहिजे.

Web Title: Growth from Mahadwar to Rankala area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.