किराणा दुकानात चोरी ; एक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST2021-07-12T04:16:47+5:302021-07-12T04:16:47+5:30

इचलकरंजी : आसरानगर येथे किराणा दुकानाचे लोखंडी पत्र्याच्या दरवाजाची कडी तोडून काउंटरमधून रोख रक्कम तीन हजार ५०० रुपये चोरत ...

Grocery store theft; In possession of one | किराणा दुकानात चोरी ; एक ताब्यात

किराणा दुकानात चोरी ; एक ताब्यात

इचलकरंजी : आसरानगर येथे किराणा दुकानाचे लोखंडी पत्र्याच्या दरवाजाची कडी तोडून काउंटरमधून रोख रक्कम तीन हजार ५०० रुपये चोरत असताना दुकान मालकानेच घटनास्थळी एकास पकडले. माधव अतुल बकमन (वय २७, रा. कुमारग्रामद्वार, पश्चिम बंगाल) असे त्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार अर्जुन काकासाहेब काळे हा फरार आहे. हा प्रकार शनिवारी (दि.१०) मध्यरात्री घडला होता. याबाबतची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुनील बाबूराव पाटील (३८) यांचे आसरानगरमध्ये किराणा दुकान आहे. दुकानाच्या लोखंडी पत्र्याच्या दरवाजची कडी तोडून काउंटरमधील असलेले तीन हजार ५०० रुपये वरील संशयित चोरले होते. दुकान उघडे असल्याची माहिती मालक सुनील यांना समजताच त्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यावेळी माधव यास रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले. तर त्याचा साथीदार अर्जुन याचा शोध सुरू आहे.

Web Title: Grocery store theft; In possession of one