उदयसिंहराव गायकवाड यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:25 IST2021-08-29T04:25:40+5:302021-08-29T04:25:40+5:30
बांबवडे : जिल्ह्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांना ९१ व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्यावतीने अभिवादन करण्यात ...

उदयसिंहराव गायकवाड यांना अभिवादन
बांबवडे : जिल्ह्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांना ९१ व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. सोनवडे -बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ संचालक महादेव पाटील, युवा नेते रणवीरसिंग गायकवाड, जि.प. सदस्य विजय बोरगे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष उत्तम मोरे, संचालक राजाराम चव्हाण, पंडितराव शेळके, अजित पाटील, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक भगवान पाटील, अथनीचे युनिट हेड रवींद्र देशमुख, चिफ केमिस्ट प्रल्हाद पाटील, चीफ इंजिनियर सर्जेराव पाटील, समीर पाटील, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सूरज बंडगर, जगन्नाथ जोशी, कामगार वर्ग इत्यादी उपस्थित होते.