जिल्हा परिषदेत शिवरायांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST2021-02-20T05:13:18+5:302021-02-20T05:13:18+5:30
कोल्हापूर : युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह ...

जिल्हा परिषदेत शिवरायांना अभिवादन
कोल्हापूर : युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवारी जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याहस्ते शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी व त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आजच्या काळातही गरजेचे आहे. यावेळी प्रकल्प संचालक रवी शिवदास, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम उपस्थित होते. बी. पी. माळवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती सांगितली.
१९०२२०२१ कोल झेडपी ०१
जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डावीकडून राहुल कदम, संजय राजमाने, अरुण जाधव, रवी शिवदास, दीपक घाटे उपस्थित होते.