गडहिंग्लज : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १४७ वी जयंती गडहिंग्लज शहर व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. गडहिंग्लज तहसील कार्यालयात तहसीलदार दिनेश पारगे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
गडहिंग्लज नगरपालिकेत नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, लेखापाल शशिकांत मोहिते, ओंकार बजागे, प्रशांत शिवणे, श्रीकांत गीते, राजेंद्र भुईंबर, अनिल चव्हाण, भारती पाटील उपस्थित होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे समितीचे अध्यक्ष श्रीकांत विटेकरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रामकुमार सावंत, पुंडलिक सावरे, रोहित सलवादे, आप्पासाहेब बारामती, संतोष कांबळे, उमेश बारामती, आप्पासाहेब गुंठे, दिगंबर विटेकरी, प्रकाश कांबळे, अनिल सावरे उपस्थित होते.
येथील समता विचारमंचतर्फे शाहूरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळेश नाईक, उदय कदम, कल्पना कांबळे, सिद्धार्थ बन्ने, प्रकाश कांबळे, साताप्पा कांबळे, सुरेश थरकार, गणपतराव पाटोळे, सुरज कांबळे, पूनम कांबळे उपस्थित होते.
येथील घाळी महाविद्यालयात प्राचार्य मंगलकुमार पाटील यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी शिवाजीराव भुकेले, दत्ता पाटील, शशिकांत संघराज, सरला आरबोळे, अनिल उंदरे उपस्थित होते.
हरळी येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
-
फोटो ओळी-
गडहिंग्लज नगरपालिकेत नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.