गडहिंग्लज तालुक्यात सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST2021-01-04T04:21:22+5:302021-01-04T04:21:22+5:30
------------------------------------------- * चैतन्य अपंगमती विकास विद्यालय भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात रेखा पोतदार यांच्या हस्ते सावित्रीबाई ...

गडहिंग्लज तालुक्यात सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
-------------------------------------------
* चैतन्य अपंगमती विकास विद्यालय
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात रेखा पोतदार यांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी प्रा. पांडुरंग पाटील, एस. पी. थरकार, बाबूराव आयवाळे, शामल हरळीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल कांचन घाटगे (मडिलगे) यांचा पोतदार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी शंकर कांबळे, परशुराम कांबळे, महेश कांबळे, शिवाजी घाटगे, साताप्पा कांबळे, सोनाली शिपुरे, संभाजी पोवार, आदी उपस्थित होते.
--------------------------------------
* नूलमध्ये सावित्रीबाईंना अभिवादन
नूल : येथील इंदरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेमध्ये चिदानंद हुचगोंड यांच्या हस्ते फुलेंच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रतीक्षा दिवळी, पूर्वा पाटील, भारती चौगुले या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. श्रीशैल साखरे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
--------------------------------------
* फोटो ओळी : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी साताप्पा पाटील, रेखा पोतदार, शंकर कांबळे, एस. पी. थरकार, परशुराम कांबळे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०३०१२०२१-गड-०८