सरसेनापती संताजी घोरपडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:38+5:302021-06-19T04:17:38+5:30
सेनापती कापशी : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कार्यस्थळावर शूरवीर मराठा योद्धे सरसेनापती ...

सरसेनापती संताजी घोरपडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
सेनापती कापशी : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कार्यस्थळावर शूरवीर मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त फोटो पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संस्थापक ग्रामविकास मंत्री हसनस मुश्रीफ, कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी संताजी घोरपडे यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी डिस्टलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्यांमधील सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :- बेलेवाडी काळम्मा (ता.कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कार्यस्थळावर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या प्रतिमेचे पुजन करताना जनरल मँनेंजर संजय घाटगे , यावेळी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते .