भीमा-कोरेगाव स्मृती स्तंभाच्या प्रतिकृतीस अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:23 IST2021-01-03T04:23:51+5:302021-01-03T04:23:51+5:30

कोल्हापूर : भीमा-कोरेगाव विजयी स्तंभ शौर्य स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा बौद्ध-अवशेष व विचार संवर्धन समितीच्यावतीने बिंदू चौक येथे स्मृती ...

Greetings to the replica of the Bhima-Koregaon Memorial Pillar | भीमा-कोरेगाव स्मृती स्तंभाच्या प्रतिकृतीस अभिवादन

भीमा-कोरेगाव स्मृती स्तंभाच्या प्रतिकृतीस अभिवादन

कोल्हापूर : भीमा-कोरेगाव विजयी स्तंभ शौर्य स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा बौद्ध-अवशेष व विचार संवर्धन समितीच्यावतीने बिंदू चौक येथे स्मृती स्तंभाच्या प्रतिकृतीस अभिवादन करण्यात आले.

भीमा-कोरेगाव येथील लढ्यातील योद्धा शिदनाक महार यांचे वंशज सुभाष इनामदार यांच्याहस्ते स्तंभास व अध्यक्ष टी. एस. कांबळे यांच्याहस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. समता सैनिक दलातर्फे सामुदायिक मानवंदना देण्यात आली. दलित कलारंग मंचच्या कलाकारांनी शाहिरी सादर केली.

यावेळी बापूसाहेब कांबळे, तात्यासाहेब कांबळे, विपुल वाडीकर, रमेश कांबळे, मारुती साखरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

--

फोटो नं ०१०१२०२१-कोल-बिंदू चाैक अभिवादन

ओळ : भीमा-कोरेगाव विजयी स्तंभ शौर्य स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा बौद्ध-अवशेष व विचार संवर्धन समितीच्यावतीने बिंदू चौक येथे स्मृती स्तंभाच्या प्रतिकृतीस अभिवादन करण्यात आले.

-

Web Title: Greetings to the replica of the Bhima-Koregaon Memorial Pillar