शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

राजमाता जिजाऊंना अभिवादन

By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST

शहरात प्रतिमापूजन : विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : राजमाता जिजाऊ यांच्या ४१७ व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संघटना, संस्थांच्यावतीने जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मनपाच्यावतीने के.एम.सी. कॉलेजच्या प्रांगणातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर मोहन गोंजारे, नगरसेवक रविकिरण इंगवले, इंद्रजित बोंद्रे, नगरसेविका प्रभाताई टिपुगडे, मीना सूर्यवंशी, आदी उपस्थित होते. गुरुवार पेठ येथील राजमाता तरुण मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष संदीप कसबेकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, बजरंग दलाचे संभाजी साळोखे, ऋतुराज क्षीरसागर, किरण शिराळे, वीरेंद्र मंडलिक, हर्षल सुर्वे, हेमंत कांदेकर, दीपक काटकर, संदीप देसाई, आदी उपस्थित होते. शुक्रवार पेठ येथील शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे के.एम.सी. कॉलेजच्या प्रांगणातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता करून रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानचे सदस्य कुणाल बोडके व संभाजी पाटील यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष स्वप्निल पाटील, सचिव विकास भोसले, प्रशांत जाधव, प्रवीण कांबळे, संकेत भोसले, अबिद गडकरी, प्रफुल्ल भालेकर, अमोल पोवार, राहुल सूर्यवंशी, बंडू माळी, सागर सावंत, शेखर महाडिक, राकेश माताडे, आदी उपस्थित होते. सीपीआरमध्ये बालसंगोपन साहित्य वाटपराष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आज, सोमवारी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) प्रसूती विभागात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी नवजात बालकांना बालसंगोपनविषयक साहित्याचे वाटप केले. रविवारी (दि. १२) मध्यरात्रीपासून जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींना साबण, तेल, पावडर असे सुमारे ५० जणांना बालसंगोपनविषयक साहित्य देण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात, विभागप्रमुख डॉ. शिरीष शानभाग व परिचारिका यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी चंद्रकांत पाटील, चारुशीला पाटील, बाळासाो पाटील, फिरोजखान उस्ताद, विकास जाधव, आदी उपस्थित होते.कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयातील बाळंतीण महिलांना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने बालसंगोपनविषयक साहित्याचे वाटप केले.विद्यापीठात अभिवादनराजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज, सोमवारी शिवाजी विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातील पोर्चमध्ये प्रतिमा पूजन झाले. प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांच्यासह विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. मेधा नानिवडेकर, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. व्ही. एन. शिंदे, बाळासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.