शिवप्रेमींकडून राजमाता जिजामाता यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:36+5:302021-06-18T04:17:36+5:30

कोल्हापूर : शहरातील शिवप्रेमी आणि त्यांच्या विविध संघटनांच्यावतीने गुरुवारी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मॉं साहेब (जिजामाता) यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन ...

Greetings to Rajmata Jijamata from Shiva lovers | शिवप्रेमींकडून राजमाता जिजामाता यांना अभिवादन

शिवप्रेमींकडून राजमाता जिजामाता यांना अभिवादन

कोल्हापूर : शहरातील शिवप्रेमी आणि त्यांच्या विविध संघटनांच्यावतीने गुरुवारी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मॉं साहेब (जिजामाता) यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. गंगावेश येथील केएमसी कॉलेज आणि राजमाता जिजामाता हायस्कूलच्या परिसरातील जिजामाता यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

येथील शाश्वत प्रतिष्ठानच्यावतीने राजमाता जिजामाता यांच्या पुतळ्याला राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. गुरुदत्त म्हाडगूत, उपाध्यक्ष राहुल चौधरी, सचिव नीलेश कांबळे, खजानिस अविनाश टकळे, संचालक अजय पाटील, सुनील हंकारे, शेखर वडींगेकर आदी उपस्थित होते.

शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने केएमसी कॉलेज प्रांगणामधील राजमाता जिजामाता यांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करून तेथे फुलांची सजावट करण्यात आली. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, कैलास दुधनकर, प्रशांत जाधव, श्रेयस कुरणे, आनंदा कांबळे, नीलेश कांबळे, शेखर वडणगेकर आदी उपस्थित होते. गुरुवार पेठेतील राजमाता तरुण मंडळातर्फे राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष धनाजी आमते, राहुल केर्लेकर, शंभू घाडगे, निवास केर्लेकर, सौरभ आमते, शुभम लाड, सुनील केर्लेकर, आशिष केर्लेकर, विराज यादव आदींसह केएमसी कॉलेजमधील कर्मचारी उपस्थित होते. यूथ सोशल पॉवर ग्रुपच्यावतीने पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रुपचे संस्थापक ओंकार शिंदे, शुभम माळवी, जयराज ओतारी, प्रथमेश हावळ, तुषार केसरे, रोहन शिंदे, ताहिरा तांबोळी, ओंकार हावळ, स्नेहा प्रभाळे, साक्षी गावडे, आदी उपस्थित होते.

फोटो (१७०६२०२१-कोल-जिजामाता अभिवादन) : कोल्हापुरात गुरुवारी शाश्वत प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजामाता यांना अभिवादन केले.

Web Title: Greetings to Rajmata Jijamata from Shiva lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.