हुतात्मा क्रांती संस्थेतर्फे नेताजींना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:17+5:302021-01-25T04:23:17+5:30
कोल्हापूर : हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२४ व्या जयंतीनिमित मिरजकर तिकटी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस ...

हुतात्मा क्रांती संस्थेतर्फे नेताजींना अभिवादन
कोल्हापूर : हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२४ व्या जयंतीनिमित मिरजकर तिकटी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. भरत खराटे व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कोविड काळात केलेल्या चांगल्या कामाबद्दल लक्ष्मीपुरी ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर, राजारामपुरी ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल, जुना राजवाडा ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांना रोपटे व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पाचगांवचे सरपंच संग्राम पाटील व कळंब्याचे सरपंच सागर भोगम यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन किसनराव कल्याणकर यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष रामेश्वर पत्की यांनी नेताजींच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास भूपाल शेटे, नचिकेत बागलकोटे, मुसा शेख, अनिल कोळेकर, जयकुमार शिंदे, सतीश पोवार, प्रमाेद सरनाईक, सुनील हंकारे, डॉ. गुरुदास म्हाडगुत, राहुल चौधरी, विजय जाधव उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २३०१२०२१-कोल-सुभाषचंद्र बोस
ओळ - कोल्हापुरातील मिरजकर तिकटी चौकातील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिल कोळेकर, सागर भोगम, संग्राम पाटील, प्रा. भरत खराटे, अनिल गुजर, रामेश्वर पत्की, जयकुमार शिंदे उपस्थित होते.